बारामती : महान्यूज लाईव्ह
आज बारामती मध्ये भिगवण रस्त्यावर अर्बनग्राम येथील रहिवासी असलेल्या आयटी इंजिनियरला कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
हा आयटी इंजिनियर गेल्या काही दिवसांपासून वर्क फ्रॉम होम करीत होता, मात्र होमिओपॅथी औषध उपचारासाठी पुणे येथे त्याचे जाणे झाल्याने त्या दरम्यानच्या प्रवासादरम्यान त्याच कोरोनाची बाधा झाल्याचा संशय आहे. 21 जून रोजी हा आयटी अभियंता पुणे येथील निगडी येथे गेला होता. एक दिवसभर तिथे होता. तिथून आल्यानंतर त्यास सर्दीचा त्रास सुरू झाल्याने त्याने स्वतःहून रुई येथे जाऊन तपासणी करण्याचा निर्णय घेतला. यामध्ये त्याची तपासणी पॉझिटिव्ह आली.
आता त्याच रुई येथील कोविंड केअर सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यास किरकोळ लक्षणे आहेत. दरम्यान त्यांच्या संपर्कातील सहा जणांची कोरोनाची तपासणी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतलेला आहे अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर मनोज खोमणे यांनी दिली.
गेल्या काही दिवसांपासून बारामती कोरोना मुक्त होती. या आयटी अभियंत्याच्या माध्यमातून पुन्हा एकदा बारामती मध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आहे.










