
एक शहरातील तर दुसरा जंक्शन परिसरातील
इंदापूर : महा न्यूज लाईव्ह
आज इंदापूर शहरात नव्याने एक पुरुष व जंक्शन येथील एक महिला कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे आढळून आले.
इंदापूर शहरातील महतीनगर येथे एक पुरुष कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आला आहे. त्यांच्यावर पुणे येथे दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत. तर जंक्शन येथील कोरोनाची रुग्ण महिला असून ती दुकान व्यवसायिक आहे. यापूर्वी जंक्शन मध्ये रूग्ण सापडला होता, त्या परिसरातच हा दुसरा रुग्ण आढळून आल्याने परिसरात घबराट पसरली आहे.
तहसीलदार सोनाली मेटकरी यांनी आज ही माहिती दिली. जंक्शन येथील महिला चिंचवड पुणे येथील बिर्ला हॉस्पिटल येथे उपचार घेत आहे. तर इंदापूरचा ॲटोमोबाईल दुकान व्यावसायिक असलेला रुग्ण पुणे येथे दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल येथे उपचार घेत आहे.
दरम्यान इंदापूर तालुक्यात दररोज कोठे ना कोठे रुग्ण आढळू लागल्याने चिंता वाढली आहे . असे असले तरी तालुक्यातील दररोजच्या वातावरणामध्ये काहीही फरक पडलेला नाही बाजारपेठा व दैनंदिन व्यवहार सुरळीत सुरू आहेत.










