दौंड : महान्युज लाईव्ह
दौंड शहरातील कोरोना बाधीतांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून आज एका दिवसात सहा जणांना कोरोनाची लागण झालेल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे, अशी माहिती दौंड उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. संग्राम डांगे यांनी दिली.
दौंडच्या ग्रामीण भागातील केडगाव, बोरीपार्धी, खुटबाव, पाटस आणि वरवंडमध्ये कोरोना बाधीत रूग्ण सापडले होते. त्याचवेळी दौंड शहरात मात्र कोरोना बाधीतांची संख्या कमी होत नसल्याचे चित्र आहे. शहरातील ४६ जणांची कोरोना विषाणूची तपासणी करण्यात आली होती. त्याचा अहवाल आज प्राप्त झाला असून सहा जणांना नव्याने कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. यामध्ये चार पुरुष व दोन महिलांचा समावेश आहे.
दौंड शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोना संसर्ग वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.










