
दौंड : महान्युज लाईव्ह
दौंड तालुक्यातील पाटस मधील दोन प्रसिद्ध डॉक्टरांना कोरोनाची लागण झाल्याचे आज निष्पन्न झाल्याची अशी माहिती वरवंड प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डाँ बनसोडे व पाटस चे आरोग्य सेवक भीमराव बडे यांना दिली.
दोन दिवसापुर्वी केडगाव व बोरीपार्धी येथील डॉक्टरांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले होते. केडगाव येथील या डॉक्टरांच्या संपर्कात पाटस येथील एका डाक्टर संपर्कात आले होते. यामुळे आरोग्य विभागाने त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींची कोरोना तपासणी केली असता पती व पत्नी असलेल्या या दोन्ही डॉक्टरांचा कोरोना अहवाल पाँझिटिव्ह आला आहे. दरम्यान काल दिवसभर संबंधित रूग्णालय चालू होते आणि रुग्णाची गर्दी होती, यामुळे या डाॅक्टर च्या संपर्कात नेमकी किती जण आले आहेत याचा शोध आरोग्य विभाग घेत असून चिंता वाढली आहे.
दरम्यान आरोग्य विभागाने आज सकाळी सर्व दुकाने बंद केली असून काळजी व दक्षता घेण्याचे आव्हान केले आहे. दौंड तालुक्यात राज्य राखीव दलाच्या जवानांना नंतर वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित डॉक्टरांनाही कोरोनाची लागण झाल्याने सर्वाधिक चिंता ग्रामीण भागात निर्माण झाली आहे











गेल्या चार दिवसांपासून केडगाव आणि आता पाटस परिसरातील कोरोणा पॉझिटीव्ह डॉक्टरांच्या न्युज पाहतोय पण एकदा पण आपल्या चॅनल ने डॉक्टरांचे नाव सांगितले नाहि तरी अशा प्रकारच्या अर्धवट न्युज दिल्याने लोक confuse होत आहेत कृपया याची दक्षता घ्यावी.