• Contact us
  • About us
Tuesday, June 9, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

वन विभागाने ११० एकर अतिक्रमण केलेली वनजमीन मुक्त केली

Maha News Live by Maha News Live
June 19, 2020
in शेती शिवार, क्राईम डायरी, राजकीय, लाईव्ह, पुणे, व्यक्ती विशेष, Featured
0
वन विभागाने ११० एकर अतिक्रमण केलेली वनजमीन मुक्त केली

भाजपच्या विरोधानंतर शेवटच्या टप्प्यात कारवाई थांबवली

सुरेश मिसाळ, महान्यूज लाईव्ह 
इंदापूर : वन विभागाने मागील काही दिवसांपूर्वी थांबवलेली अतिक्रमण विरोधी कारवाई पुन्हा सुरू करीत इंदापूर तालुक्यातील १०० एकराहून अधिक क्षेत्रातील अतिक्रमण काढले, मात्र गोखळी येथील अतिक्रमण काढताना भाजपने केलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी हस्तक्षेप करीत ही कारवाई थांबवली.
वन विभागाने मागील वर्षी ११०० एकर वनजमीन अतिक्रमणाच्या तडाख्यातून बाहेर काढली. ही जमीन मुक्त करताना वन विभागाने आक्रमक भूमिका घेतली. त्यामध्ये वर्षानुवर्षे अतिक्रमण केलेले शेतकरी मात्र नाराज झाले. अर्थात वनजमीन व वनाधिकारानुसार कायद्याचा भंग हे शेतकरी करीत असल्याने ही कारवाई सुरू असल्याचे वन विभागाने स्पष्ट केले होते. मागील वर्षी वन विभागाने तब्बल ११०० एकर वनजमीन अतिक्रमणातून मुक्त केली व त्या ठिकाणी वृक्षारोपणही केले. गेल्या वर्षीचा हा उत्साह कायम ठेवत वन विभागाने मागील दोन दिवसांपासून इंदापूर तालुक्यात लासुर्णे, राजवडी, गोखळी, वरकुटे खुर्द आदी गावांतील अतिक्रमणे काढली. ही अतिक्रमणे काढताना द्राक्षबागा, पत्र्यांची बांधकामे, विकसित केलेली बागायती शेती या साऱ्यांवर वन विभागाने जेसीबी, रोटावेटर चालवले. लासुर्णे येथे १० एकर, राजवडी येथे १५ एकर, गोखळी येथे १८ एकर, वरकुटे खुर्द येथे ३७ एकरावरील व पिंपळीतील ३० एकरातील अतिक्रमणे काढण्यात आली.
सहायक वनसरंक्षक संजय मारणे यांच्या उपस्थितीत व मुख्य वनसंरक्षक विवेक खांडेकर, उपवनसंरक्षक श्री लक्ष्मी यांच्या मार्गदर्शनाखाली सासवड, वडगाव मावळ, पुणे, बारामती, इंदापूर व दौंड या सहा तालुक्यातील वनपरीक्षेत्र अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या पथकाने यात भाग घेतला. राज्य राखीव पोलिस दलाचेही संरक्षण याला होते.
या कारवाईची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी राहूल काळे यांनी महान्यूज ला दिली. काळे म्हणाले,` वन विभागाच्या हद्दी मोजून निश्चित करून संबंधित अतिक्रमणधारकांना पाच महिन्यांपूर्वीच नोटीसा दिल्या होत्या. काही ठिकाणी शेतकऱ्यांनी वन विभागाकडून मिळालेल्या जमीनी पेक्षा अधिकचे क्षेत्र वहिवाटण्यास सुरवात केली होती. ते काढणे क्रमप्राप्त होते. भारतीय वनअधिनियम १९२७ कायद्यानुसार स्वतःच्या वनहद्दी निश्चित करून वनजमीनींवरील अतिक्रमण हटविली. गोखळी येथे हे काम थांबविण्यात आले.

भाजपच्या विरोधानंतर अतिक्रमण विरोधी कारवाई थंडावली

दरम्यान माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आक्रमक भूमिका घेत या कारवाईस विरोध केला. त्यांनी हे अतिक्रमण काढतानाची वेळ आणि वन खात्याची भूमिका ही चीड आणणारी व शेतकऱ्यांवर अन्याय करणारी असल्याचे म्हटले. त्यानंतर इंदापूर पोलिसांनी हस्तक्षेप करीत वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची समजूत काढली. सध्या कोरोनाचा लॉकडाऊनचा काळ असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, त्यामुळे सध्या ही कारवाई थांबवावी असे त्यांनी स्पष्ट केल्यानंतर वन विभागाने ही कारवाई आटोपती घेतली.
हर्षवर्धन पाटील म्हणाले,` कोरोनाच्या लॉकडाऊन काळात व शेतकऱ्यांचे व शेतीचे बरेचसे नुकसान झाले असतानाच ही कारवाई केली जात आहे. त्यातच सध्या पावसाळा सुरू आहे आणि हे अतिक्रमण वर्षानुवर्षाचे आहे. सरकारी अधिकाऱ्यांनी या तालुक्यातील गावांवर केलेली कारवाई अन्यायकारक आहे. ज्या कायदेशीर गोष्टी असतील त्या शासकीय पातळीवर सामोपचाराने सोडविता आल्या असत्या. मात्र सध्याची स्थिती एका वेगळ्या संकटाची असताना, वन खात्याचेच मंत्री या तालुक्यात असताना देखील लोकांच्या प्रपंचावर जेसीबी, पोकलेन सारख्या उपकरणाचा घाला घालून अगोदरच संकटात असणाऱ्या जनतेवर मानवी अधिकचे संकट निर्माण केल्याने या भागातील जनता पुढील अनेक प्रश्नांनी चक्रावली आहे. याविषयी आपण वरिष्ठांशी पत्रव्यवहार करून त्यांच्यावर होणाऱ्या अन्याय सरकारी दरबाराकडे आणणार आहोत.’

Next Post

बारामतीतील महिला रुग्णाचा खाजगी प्रयोगशाळेतील कोरोना तपासणीचा अहवाल पॉझिटिव्ह

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

May 29, 2026
मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

May 29, 2026
पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

May 29, 2026
गुप्तधनाचा बहाणा… प्राध्यापकाचा बळी; ४० दिवसांनी उघडली खुनी खेळी!

अवैध मुरूम उत्खननाची तक्रार केल्याने तक्रारदारावर जीवघेणा हल्ला! दौंड तालुक्यातील हिंगणीगाडा येथील घटना! तिघांवर गुन्हा!

May 29, 2026
राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

May 29, 2026
बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

May 29, 2026
शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

May 29, 2026
बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

May 29, 2026
‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

May 29, 2026
बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा मोठा भांडाफोड; तुकाराम मुंढेंची राज्यभर पडताळणी मोहीम! 10 हजार 922 कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू; 316 जणांवर कारवाई!

माफी मागून सक्तीची निवृत्ती घ्या!बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांवर न्यायालयाचा मोठा दणका; राज्यभर १२० दिवसांत पुनर्पडताळणीचे आदेश

May 29, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group