योगेश जगताप मित्र मंडळाचा अभिनव उपक्रम..
बारामती : महान्यूज लाईव्ह
देशावर सध्या कोरोनाचं संकट ओढावले आहे. या आजारावर कोणतेही औषध उपलब्ध नसल्याने समाजातील सर्वच घटक धास्तावले आहेत. या पार्श्वभूमीवर बारामतीचे माजी नगराध्यक्ष आणि माळेगाव कारखान्याचे संचालक योगेश जगताप यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत योगेश जगताप मित्रमंडळाच्या वतीने माळेगाव कारखान्यातील कामगार आणि अधिकारी वर्गाला आर्सेनिक अल्बम या गोळ्यांचे मोफत वाटप करण्याचा अभिनव उपक्रम राबवण्यात आला.
वाढदिवसानिमित्त होणारा अनावश्यक खर्च टाळून सामाजिक उपक्रम राबवण्यावर योगेश जगताप मित्रमंडळाचा भर असतो. त्यातूनच आजतागायत रक्तदान, दत्तक विद्यार्थी योजना, रोजगार मेळावा अशा अनेक सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी देशावर कोरोनाचे संकट असताना योगेश जगताप मित्रमंडळाने माळेगाव सहकारी साखर कारखान्यातील कामगार आणि अधिकारी वर्गाला आर्सेनिक अल्बम या प्रतिकार शक्ती वाढवणाऱ्या गोळ्यांचे वाटप करण्यात आले.
ही औषधे कारखान्याचे कार्यकारी संचालक विजय वाबळे, वैद्यकीय प्रमुख शेखर देवकाते आणि विविध विभागांच्या प्रमुखांकडे सुपुर्द करण्यात आली. यावेळी कौशल सराफ, संग्राम जगताप, अजित जगताप, बाळासाहेब कोकरे, पप्पू जगताप, निलेश महाडीक, चंद्रजीत धुमाळ, अलीअसगर बारामतीवाला, युसुफ कायमखानी, कैलास वणवे, मेहुल दोशी, बजरंग जगताप, दादा जराड आदी मान्यवर उपस्थित होते.










