रणजित उर्फ बंटीभैय्या तावरे पाटील युवा मंचचा उपक्रम
बारामती : महान्यूज लाईव्ह
राज्यावर कोरोनाचे संकट ओढवलेले असतानाच रक्ताचा तुटवडा भासत आहे. त्यामुळे अनेक रुग्णांवर उपचारासाठी अडचणी येत आहेत. या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजीमहाराज यांचा राज्याभिषेक सोहळा आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधत शिवनगर येथील रणजित उर्फ बंटीभैय्या तावरे पाटील युवा मंचच्या माध्यमातून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरामध्ये १५१ जणांनी रक्तदान करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या आवाहनला उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.
राज्यात भासत असलेल्या रक्ताच्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा वर्धापनदिन रक्तदान शिबिराचे आयोजन करुन साजरा करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत शिवनगर येथील रणजित उर्फ बंटीभैय्या तावरे पाटील युवा मंचने गिरीजा ब्लड बॅंकेच्या सहकार्यातून शिवतीर्थ मंगल कार्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन केले. या शिबिराचे उदघाटन माळेगाव कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब तावरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, माळेगावचे संचालक स्वप्निल जगताप, रणजित अशोकराव तावरे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
राज्यात रक्ताचा तुटवडा भासत असल्याने सामाजिक जाणीवेतून आयोजित केलेल्या या उपक्रमात १५१ जणांनी रक्तदान केले. एकीकडे कोरोनाचे भयाण संकट असतानाच या संकटाशी सुरु असलेल्या लढ्याला हातभार लावण्याचा आदर्शवत उपक्रम रणजित उर्फ बंटीभैय्या तावरे युवा मंचच्या माध्यमातून राबवण्यात आल्याबद्दल सर्वच मान्यवरांनी कौतुक केले.










