दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड शहारात राज्य राखीव दलातील नव्याने चार जवानांना कोरोनाची लागन झाल्याचे आज निष्पन्न झाले आहे.दौंड शहरातील एका महिलेचा सोमवारी कोरोनामुळे मृत्यू झाल्याने कोरोनाने शहरात पाचवा बळी घेतला आहे.
राज्य राखीव दल गट क्र. ७ च्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली खान यांनी आज ही माहिती दिली. राज्य राखीव दलातील जवान व इतरांसह एकूण ४१ जणांची कोरोना विषाणूची तपासणी एसआरपीच्या वैद्यकीय विभागाने केली, त्यातील ३८ जणांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये ४ जवानांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले. यापूर्वीच्या कोरोनाबाधित सर्व जवानांनी कोरोनावर मात केली आहे.
दरम्यान दौंड शहरातील एका महिलेचा सोमवारी कोरोनामुळे मृत्यू झाला, तर शहरातली एका कोरोनाबाधिताने सोमवारी कोरोनावर मात केली आहे. दौंड शहरामध्ये कोरोनामुळे हा पाचवा बळी गेल्याने दिवसेंदिवस कोरोनाची स्थिती बिकट बनत चालली आहे.










