• Contact us
  • About us
Thursday, May 28, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘राष्ट्रवादी’च्या २१ व्या वर्धापनदिनानिमित्त रक्तदान करण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे आवाहन

Maha News Live by Maha News Live
June 9, 2020
in मराठवाडा, मुंबई, उत्तर महाराष्ट्र, कोकण, राजकीय, राज्य, पश्चिम महाराष्ट्र, पुणे
0

राष्ट्रवादीचं महाराष्ट्राच्या जडणघडणीतील योगदान; युवा कार्यकर्ते व नेतृत्वाची सक्षम फळी हीच पक्षाची ताकद : अजित पवार

मुंबई : महान्यूज लाईव्ह 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महाराष्ट्रातील जनतेच्या आशा-आकांक्षा पूर्ण करणारा, तरुणांना नेतृत्वाची संधी देणारा पक्ष आहे. पक्षानं गेल्या 21 वर्षांच्या वाटचालीत महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक जडणघडणीत दिलेलं योगदान, राज्यात उभी केलेली युवा कार्यकर्त्यांची, नेतृत्वाची सक्षम फळी हीच पक्षाची ताकद आहे. हीच ताकद भविष्यातही महाराष्ट्राला प्रगतीकडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला उज्वल यशाकडे घेऊन जाईल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला असून राज्यातील जनतेला तसंच पक्ष कार्यकर्त्यांना पक्षाच्या 21व्या वर्धापनदिनानिमित्तानं शुभेच्छा दिल्या आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार शुभेच्छा संदेशात म्हणतात की, आदरणीय शरद पवार साहेबांनी 10 जून 1999 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केल्यापासून एखाद् दुसरा अपवाद वगळता महाराष्ट्रातील जनतेनं सातत्यानं पक्षावर विश्वास दाखवला आहे. ही जनतेच्या विश्वासाची सर्वात मोठी पावती आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं देखील जनतेचा विश्वास वेळोवेळी सार्थ ठरवत महाराष्ट्राच्या जडणघडणीत सातत्यानं योगदान दिलं. शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या, दुर्बल, वंचित, उपेक्षित बांधवांच्या प्रत्येक संकटात आदरणीय पवार साहेबांसह पक्षाचा कार्यकर्ता मदतीसाठी धावून गेला आहे. पक्षाची आजवरची यशस्वी वाटचाल ही आदरणीय साहेबांचं समर्थ नेतृत्वं आणि लाखो कार्यकर्त्यांच्या मेहनतीचं फळ आहे. 

कार्यकर्त्यांच्या संघर्षाचं यशराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आज पुन्हा एकदा, राज्यात सत्तेवर आहे. ही संधी सहजपणे मिळाली नसून गेली पाच वर्षे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या संघर्षातून मिळाली आहे. गेली पाच वर्षे तत्कालिन सरकारच्या शेतकरीविरोधी, लोकविरोधी धोरणांविरोधात कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. राज्यव्यापी शिवस्वराज्य यात्रा, संघर्ष यात्रा, परिवर्तन यात्रा काढली. दुष्काळग्रस्तांच्या प्रश्नावर ‘जेलभरो’सारखी आंदोलनं केली. विधीमंडळात, विधीमंडळाबाहेर रस्त्यावर उतरुन जनतेसाठी संघर्ष केला. स्वत: आदरणीय साहेबांनी अनेक ठिकाणी संघर्षाचं नेतृत्वं केलं. त्यातून पक्षाला ही संधी मिळाली आहे. या संधीचा उपयोग राज्यातील शेतकरी, कष्टकरी, सर्वसामान्य जनतेला न्याय देण्यासाठी, जनतेच्या इच्छा, आशा-आकांक्षा पूर्ण करण्यासाठी करायचा आहे, असे उपमुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.

सोशल डिस्टन्सिंग पाळून रक्तदान शिबिरांचं आयोजनमहाराष्ट्र कोरोना संकटाचा सामना करीत असल्यानं पक्षाचा वर्धापनदिन उद्या अत्यंत साधेपणानं साजरा करायचा आहे. कुठेही जाहीर कार्यक्रम घ्यायचे नाहीत. गर्दी न करता, सोशल डिस्टन्सिंगचे, सुरक्षिततेचे सर्व नियम पाळून उद्या, पक्षाच्या वर्धापनदिनानिमित्त, पक्षाच्या वतीनं राज्यभर रक्तदान शिबिरांचं आयोजन करण्यात येत आहे. या शिबिरांमध्ये पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि राज्यातील जनतेनं रक्तदान करावं, सामाजिक कर्तव्य पार पाडावं, असं आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केलं आहे.

कोरोनारुग्णांना रक्ताची गरज नसली तरी राज्यात मोठ्या संख्येनं असलेल्या थॅलेसेमिया व अन्य रुग्णांना वेळोवेळी रक्ताची गरज भासते. ही गरज पूर्ण करण्यासाठी शिबिरांचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यातील नगारिक सामाजिक जाणीवेतून उद्या मोठ्या संख्येनं रक्तदान करतील, असा विश्वासही उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.राज्यातील युवक, युवतींनी ‘राष्ट्रवादी’त यावंराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गेली 21 वर्षे स्वातंत्र्य, समता, बंधुता, सर्वधर्म समभाव, राष्ट्रीय एकात्मता, लोकशाही, सर्वसमावेश विकासाच्या संकल्पनांवर दृढ विश्वास ठेवून काम करत आहे. मागासवर्गीय, आदिवासी, भटके-विमुक्त बांधव, महिला, अपंग, वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी अशा सर्व समाजघटकांना त्यांचा न्याय्य हक्क मिळवून देण्यासाठी पक्ष काम करत आहे. पक्षाचे पुरोगामी, प्रगतशील विचार, पक्षाची ध्येय-धोरणे आणि आदरणीय शरद पवार साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अधिकाधिक युवकांनी, युवतींनी, नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात यावं. अधिकाधिक समाजघटकांना पक्षाशी जोडण्यासाठी पक्षपदाधिकारी, कार्यकर्त्यांनी प्रयत्न  करावेत, असं आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. 

Tags: 21YearsBlood Donation CampCorona VirusDCM Ajit PawarNationalist Congress PartyWishes
Next Post

माळेगाव कारखान्याच्या कामगार व अधिकाऱ्यांना आर्सेनिक अल्बम गोळ्यांचं वाटप..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बॉम्बस्फोट होईल; काळजी घ्या..!सहा वर्षांच्या चिमुकल्याचं पत्र आणि राजीव गांधींचं उत्तर; डॉ. अमोल अन्नदाते यांनी सांगितली भावूक आठवण

बॉम्बस्फोट होईल; काळजी घ्या..!सहा वर्षांच्या चिमुकल्याचं पत्र आणि राजीव गांधींचं उत्तर; डॉ. अमोल अन्नदाते यांनी सांगितली भावूक आठवण

May 21, 2026
चोर सोडून संन्याशाला फाशी”; विकास लवांडे यांचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप

चोर सोडून संन्याशाला फाशी”; विकास लवांडे यांचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप

May 21, 2026
आमदार रोहित पवार यांच्या आक्रमक भूमिकेने प्रशासनाची नरमाई! कुकडी आणि जनाई शिरसाईला पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन!

आमदार रोहित पवार यांच्या आक्रमक भूमिकेने प्रशासनाची नरमाई! कुकडी आणि जनाई शिरसाईला पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन!

May 21, 2026
बारामतीतील प्रशासकीय भवनातील लिफ्ट अनेक दिवसांपासून बंद; वृद्ध,दिव्यांग नागरिकांचे हाल

बारामतीतील प्रशासकीय भवनातील लिफ्ट अनेक दिवसांपासून बंद; वृद्ध,दिव्यांग नागरिकांचे हाल

May 21, 2026
आजही बारामती तालुक्यात आमदार रोहित पवार व जय पवार यांचा गावभेट दौरा! 

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आमदार एकसंध; २२ आमदारांच्या संपर्काच्या बातम्या निराधार – उमेश पाटील

May 21, 2026
बारामतीच्या महालक्ष्मी ऑटोमोटिव्हज’ने आंतरराष्ट्रीय पातळीवर उमटवला ठसा

बारामतीच्या महालक्ष्मी ऑटोमोटिव्हज’ने आंतरराष्ट्रीय पातळीवर उमटवला ठसा

May 21, 2026
बारामतीत टर्मिनची इंजेक्शन्स सर्रास घेतली जाताहेत.. कुठला आनंद शोधताय मुलांनो? या घातक गोष्टींपासून वेळीच दूर रहा..

दौंड, केडगावसह तालुक्यात गर्भलिंग निदान व गर्भपाताचे रॅकेट सक्रीय! डॉक्टर, एजंट मोकाट! मग काय कारवाईवर फक्त प्रश्नचिन्ह?

May 21, 2026
बोरीपार्धी येथे २२ मे रोजी संयुक्त महामानव जयंती सोहळा ! माजी खासदार छत्रपती संभाजीराजे लावणार उपस्थिती!

बोरीपार्धी येथे २२ मे रोजी संयुक्त महामानव जयंती सोहळा ! माजी खासदार छत्रपती संभाजीराजे लावणार उपस्थिती!

May 21, 2026
फलटणच्या विशेष सभेत मोठा निर्णय; श्रीराम कारखाना आता श्री दत्त इंडियाकडे!

फलटणच्या विशेष सभेत मोठा निर्णय; श्रीराम कारखाना आता श्री दत्त इंडियाकडे!

May 21, 2026
कॉक्रोच जनता पार्टीची देशभरात हवा ! फक्त ५ दिवसात ९० लाख फॉलोवर्स! सत्ताधारी भाजपलाही टाकले मागे!

कॉक्रोच जनता पार्टीची देशभरात हवा ! फक्त ५ दिवसात ९० लाख फॉलोवर्स! सत्ताधारी भाजपलाही टाकले मागे!

May 21, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group