• Contact us
  • About us
Monday, June 8, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

डॉ. बाबा आढाव, हसमुख रावल यांना आबासाहेब वीर पुरस्कार प्रदान..!

Maha News Live by Maha News Live
August 31, 2021
in आरोग्य, कामगार जगत, राजकीय, राज्य, पश्चिम महाराष्ट्र, Featured
0

दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह

वाई : ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी किसन महादेव तथा आबासाहेब वीर यांच्या ११६ व्या जयंतीनिमित्त पुणे येथे साधेपणाने झालेल्या दोन वेगवेगळ्या समारंभात भुईज, ता. वाई येथील किसन वीर कारखान्याचेवतीने ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव आणि आरटीपीसीआर किटचे निर्माते हसमुख रावल यांना आबासाहेब वीर पुरस्कार प्रदान करण्यात आले.

गुलटेकडी येथील हमाल भवनात झालेल्या कार्यक्रमात डॉ. बाबा आढाव यांना आबासाहेब वीर सामाजिक पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी वैधानिक विकास मंडळाचे माजी अध्यक्ष उल्हास पवार, माजी आमदार मोहन जोशी, खंडाळा कारखान्याचे अध्यक्ष शंकरराव गाढवे, अभय छाजेड, उपराकार पद्मश्री लक्ष्मण माने, डॉ. अभिजित वेद्य, संजय बालगुडे यांची प्रमुख उपस्थिती होती. एक लाख रुपये, सन्मानपत्र, फुले पगड़ी, फुले उपरणे, शॉल, पुष्पहार देवून डॉ. आढाव आणि त्यांच्या पत्नी शीलाताई आढाव यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी बोलताना डॉ. आढाव म्हणाले, आयुष्यभर उपेक्षितांसाठी काम करताना त्यांच्या मनात विश्वास निर्माण करू शकलो, याचा आनंद आहे. मात्र त्याच विश्वासाला जर पात्र राहता आले नाही तर काय ? याचीही चिंता कायम राहिली. सध्या भलत्याच प्रश्नांना दिलेले जाणारे महत्व कळीच्या मुद्यांना झाकोळून टाकत आहेत.

लोकांच्या जगण्याच्या प्रश्नांना दुय्यम ठरवलं जात आहे. यासाठी युवकांमध्ये प्रबोधन करणे, त्यांच्याशी संवाद साधणं गरजेचं बनलं आहे. त्यातूनच नविन क्रांती जन्माला येईल. आबासाहेब वीर यांनी ज्या धाडसाने स्वातंत्र्यपूर्व काळात योगदान दिलं त्याच तडफेने त्यांनी कृषि औद्योगिक क्रांतीला चालना देण्यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या नावाचा पुरस्कार हा आनंद देणारा आहे. असेही डॉ. आढाव यांनी सांगून पुरस्काराची रक्कम शेतकरी, पूरग्रस्तांना देणार असल्याचे जाहीर केले.

उल्हास पवार म्हणाले, देव न मानणारा देवमाणूस असं बाळासाहेब भारदे यांनी बाबांचं वर्णन केलं. बाबा फुले, शाहू, आंबेडकरांचे विचार अक्षरशः जगले आहेत. कष्टकन्यांसाठी लढा देताना तडजोड हा शब्द त्यांच्या शब्दको पात कधीय आला नाही. त्यासाठी प्रसंगी समोर कोण आहे हेही न पाहता आंदोलने केली. आबासाहेब वीरांनी स्वातंत्र्यवेदीवर स्वतःला पणाला लावले. थक्क व्हावे अशा अनेक प्रसंगांनी त्यांचे आयुष्य भरलेले आहे.

मदन भोसले म्हणाले, आबासाहेब वीर यांनी स्वातंत्र्यासाठी स्वतःच्या आयुष्याचा होम केला. संपूर्ण सात्यांनी संस्थात्मक आणि संघटनात्मक कामाची भक्कम पायाभरणी केली. कोणत्याही पदाचा यत्किंचित मोह बाळगला नाही. यशवंतराव चव्हाण यांच्याशी त्यांचा स्नेह मैत्रीचा मापदंड ठरला.

आबासाहेब वीर है एक अजब रसायन होतं. त्याचपद्धतीने उभी हयात कष्टकऱ्यांसाठी अर्पण करणारे डॉ. आढाव हेही एक अजब रसायनच आहेत. त्यामुळे हा पुरस्कार त्यांना प्रदान करताना विशेष समाधान आहे.

गजानन बाबर म्हणाले, मी वेगळ्या विचारधारेत काम करणारा असलो तरी डॉ. बाबा आढाव यांच्या कार्यातूनच प्रेरणा घेवून माझे आंदोलनात्मक काम उभे केले. तेच काम मला संसदेत घेवून गेले. दरम्यान, बाणेर येथील मायलॅबच्या कार्यालयात हसमुख रावल यांना सन्मानपत्र, पन्नास हजार रुपये, शॉल, श्रीफळ, पुष्पहार देवून आबासाहेब पर प्रेरणा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

यावेळी बोलताना मदन भोसले म्हणाले, आबासाहेब वीर यांचे कार्य स्मृती चिरंतन रहावे या हेतूने वर्षापूर्वी पुरस्कार सुरु झाले. सहा वर्षांपूर्वी कर्तबगार युवकांसाठी प्रेरणा पुरस्कार सुरु केला. मायलंब कंपनीचे संस्थापक हसमुख रावल यांनी जैव तंत्रज्ञान क्षेत्रात केलेले काम अचंबित करणार आहे. देशातील पहिल्या आरटीपीसीआर चाचणी किटची निर्मिती करुन देशातील पाच करोड जनतेपर्यंत ते पोहोचवलं.

जगातील ३० देशात त्यांची १०० उत्पादनं जगभर पोहोचली आहेत. प्रेरणा पुरस्काराने जगाच्या आरोग्याची चिंता वाहणाऱ्या तरुणाचा सन्मान केल्याचा आनंद आहे. हसमुख रावल म्हणाले, किसन वीर परिवाराने केलेला हा सन्मान पुढील दहा वर्षांसाठी मिळाली आहे.

विका मायलंयने केलेले काम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी विविध संशोधन प्रयत्न केले. कोविडपेक्षाही देशाला मोठा धोका क्षयरोगाचा आहे. त्यामुळे क्षयरोग निर्मूलनासाठी पावलव विशेष प्रयत्नशील असून त्यादृष्टीने संशोधन सुरु आहे. मापलबचे काम जगभर पोहोचत असले तरी या सर्व कामापाठी संपूर्ण टिपचे योगदान आहे.

या टिमचे नेतृत्व जरी माझ्याकडे असले तरी सर्वांच्या सहकार्याशिवाय हे शक्य झाले नसते. याच एकीच्या बळावर मायलेबने आजपर्यंत केलेले काम या पुरस्काराच्या प्रेरणेने अधिक ताकदीने यापुढेही करु.

या दोन्ही कार्यक्रमास कारखान्याचे उपाध्यक्ष गजानन बाबर, संचालक सी. ए. सी. व्ही. काळे, चंद्रकांत इंगवले, नंदकुमार निकम, राहुल घाडगे, मधुकर शिंदे, चंद्रसेन शिंदे, सेक्रेटरी एन. एन. काळोखे, निवड समितीचे सदस्य अनिल जोशी, प्रा. रमेश डुबल, गुरुप्रसाद सारडा, अँड. जयवंतराव केंजळे, अँड. नंदकुमार येवलेकर, पायलॅबचे संचालक देवर्षि दे, मोहित अग्रवाल, किशोर बाबर, मेहबुब मदारखान, आनंद जाधवराव आदी उपस्थित होते. कार्यक्रमांचे सूत्रसंचालन संचालक नंदकुमार निकम यांनी केले, स्नेहल दामले यांनी मानपत्रांचे वाचन केले. नितीन पवार व हृषिकेश भोसले यांनी आभार मानले.

आस्वाद कष्टाच्या भाकरीचा…

पुरस्कार प्रदान कार्यक्रमात डॉ. बाबा आढाव म्हणाले, माझे वय ९२ आहे असे का सारखे सारखे म्हणता ? माझा उत्साह २९ चाच आहे. त्यामुळे माझे वय २९ आहे असे म्हणा, असे त्यांनी सांगताच टाळ्यांचा कडकडाट झाला. हा कार्यक्रम झाल्यानंतर डॉ. आढाव यांनी सर्वांना कष्टाची भाकर खाऊ घातली व सर्वांनी त्याचा भवानी पेठेतील छोट्याच्या कष्टाच्या भाकरीचा आनंदाने आस्वाद घेतला.

Next Post

पुणे ग्रामीण पोलिस दलातील महिला पोलिस अंमलदार यांना ८ तास ड्युटी; पोलिस अधीक्षकांचे आदेश!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

May 29, 2026
मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

May 29, 2026
पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

May 29, 2026
गुप्तधनाचा बहाणा… प्राध्यापकाचा बळी; ४० दिवसांनी उघडली खुनी खेळी!

अवैध मुरूम उत्खननाची तक्रार केल्याने तक्रारदारावर जीवघेणा हल्ला! दौंड तालुक्यातील हिंगणीगाडा येथील घटना! तिघांवर गुन्हा!

May 29, 2026
राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

May 29, 2026
बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

May 29, 2026
शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

May 29, 2026
बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

May 29, 2026
‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

May 29, 2026
बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा मोठा भांडाफोड; तुकाराम मुंढेंची राज्यभर पडताळणी मोहीम! 10 हजार 922 कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू; 316 जणांवर कारवाई!

माफी मागून सक्तीची निवृत्ती घ्या!बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांवर न्यायालयाचा मोठा दणका; राज्यभर १२० दिवसांत पुनर्पडताळणीचे आदेश

May 29, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group