• Contact us
  • About us
Saturday, June 13, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

इंदापुरातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते लय लबाड…! कामे आम्ही आणायची अन् श्रेयासाठी ते : कैलास कदम

Maha News Live by Maha News Live
August 29, 2021
in आरोग्य, कामगार जगत, राजकीय, राज्य, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, Featured
0

इंदापूर : महान्यूज लाईव्ह

आम्ही पाठपुरावा करून कामे आणायची अन् राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी श्रेयासाठी अचानक कामे चालू करायची ही पद्धत चुकीची असल्याचा आरोप गटनेते कैलास कदम यांनी केला आहे.

इंदापूर शहरातील प्रभाग क्रमांक सहा मध्ये माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे मार्गदर्शनाखाली नगराध्यक्षा अंकिता शहा यांनी जिल्हा नियोजन समितीकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे व या भागातील नगरसेवक म्हणून आपण स्वतः व नगरसेविका मीना मोमीन यांच्या पाठपुराव्याने नागरी दलितेतर वस्त्यांमध्ये सुधारणा अंतर्गत 60 लाख रुपये निधी मंजूर करून आणला.

राष्ट्रवादीने श्रेय घेण्यासाठी आपणच ही कामे मंजूर केल्याचा देखावा करत त्याचे उद्घाटन केले, ही लबाडीची पद्धत योग्य नाही, असा आरोप प्रभाग क्रमांक सहा चे नगरसेवक तथा इंदापूर नगरपालिकेचे गटनेते कैलास कदम यांनी केला आहे.

नगरपरिषदेच्या निवडणुका जवळ आलेमुळे असा केविलवाणा प्रयत्न राष्ट्रवादीने चालविला असल्याची टीका त्यांनी केली. आम्ही मंजूर केलेल्या कामाचे दोन दिवसापूर्वी राष्ट्रवादीच्या या भागातील कार्यकर्त्यांनी उद्घाटन करत समाजाला दाखवण्यासाठी देखावा केला आहे, त्यावर नगरपालिकेचे गटनेते कैलास कदम यांनी हल्ला चढवत टीका केली.

सुतार गल्ली, जामदार गल्ली, मुलाणपट्टा, रोहिदास नगर, वडारगल्ली, रामोशी गल्ली, लोहार गल्लीतील भागात नगरपरिषदेने केलेल्या कामाचे फुकटचे श्रेय राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी घेऊ नये, असा सल्लाही कदम यांनी दिला.

इंदापूर नगरपरिषदेने माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे मार्गदर्शनाखाली नगराध्यक्षा अंकिता शहा यांनी जिल्हा नियोजन समितीकडे केलेल्या प्रयत्नातून तसेच या भागातील नगरसेवक नगरपरिषदेचे गटनेते कैलास कदम, नगरसेविका मीना मोमीन यांच्या पाठपुराव्याने नागरी दलितेतर वस्त्यांमध्ये सुधारणा अंतर्गत प्रभाग क्रमांक ६ मध्ये मुलाणी हॉस्पिटल ते कुंभार घरापर्यंत अंडरग्राऊंड ड्रेनेज करणे,संभाजी चौक ते रोहिदास गल्ली ते होनराव घरापर्यंत रस्ता करणे,कुंभार वाडा ते पाणदरानाला इंद्रेश्वर मंदिरापर्यंत मुलाणपट्टा येथे रस्ता करणे,सुतार गल्ली व जामदार गल्लीमधील सर्व बोळ काँक्रीटीकरण करणे, विठ्ठल माने घर ते गायकवाड घरापर्यंत बोळ काँक्रीटीकरण करणे,रमेश बनसोडे घर ते मच्छिंद्र माने घरापर्यंत रस्ता काँक्रीटीकरण करणे या कामांसाठी जवळपास ६० लाख रूपयांचा निधी मंजूर करून आणला.

तसेच महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत रामोशी गल्लीमध्ये उमाजी नाईक समाज मंदिर ते पाटोळे घरापर्यंत अंडरग्राऊंड ड्रेनेज करणे,रामोशी गल्ली ते बावडा वेस अंडरग्राऊंड ड्रेनेज करणे,राजे उमाजी नाईक चौक ते रामोशी गल्ली व वडार गल्ली ते जोतिबा मंदिरापर्यंत रस्ता डांबरीकरण करणे याकामासाठी जवळपास ३४ लाख रूपये निधी सातत्याने पाठपुरावा करून मंजूर करून आणला.सदर कामांच्या निविदा मंजूर झाले असून काम सुरू करण्याचे आदेश देणे अजून बाकी आहे.

तोपर्यंतच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सदर कामांचे फुकटचे श्रेय घेण्याच्या हेतूने दोन दिवसांपूर्वी उदघाटन करून आम्हीच कामे मंजूर करून आणली असा दिखावा तेथील नागरिकांपुढे केला, असा आरोप कदम यांनी केला आहे.

राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी त्यांनी केलेल्या कामांचे श्रेय नक्की घ्यावे, परंतू असा रडीचा डाव करू नये. नगरपरिषदेच्या निवडणुका जवळ आलेमुळे असा केविलवाणा प्रयत्न त्यांचेकडून होताना दिसत आहे असेही कदम यांनी सांगितले.

Next Post

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात (पीएमआरडीए) ने दौंड तालुक्यातील समाविष्ट गावातील नागरीकांच्या हरकतीचे निराकरण करावे : आमदार राहुल कुल.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

May 29, 2026
मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

May 29, 2026
पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

May 29, 2026
गुप्तधनाचा बहाणा… प्राध्यापकाचा बळी; ४० दिवसांनी उघडली खुनी खेळी!

अवैध मुरूम उत्खननाची तक्रार केल्याने तक्रारदारावर जीवघेणा हल्ला! दौंड तालुक्यातील हिंगणीगाडा येथील घटना! तिघांवर गुन्हा!

May 29, 2026
राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

May 29, 2026
बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

May 29, 2026
शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

May 29, 2026
बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

May 29, 2026
‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

May 29, 2026
बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा मोठा भांडाफोड; तुकाराम मुंढेंची राज्यभर पडताळणी मोहीम! 10 हजार 922 कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू; 316 जणांवर कारवाई!

माफी मागून सक्तीची निवृत्ती घ्या!बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांवर न्यायालयाचा मोठा दणका; राज्यभर १२० दिवसांत पुनर्पडताळणीचे आदेश

May 29, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group