संदीप मापारी पाटील, बुलढाणा
लोणार तालुक्यातील स्टेट बँक शाखा हिरडव च्या वतीने मौजे पळसखेड जहाँ.येथील खातेदार त्र्यंबक संजबाराव थोरवे यांचे काही महिण्यापूर्वी सेनगाव जिंतूर मार्गावर अपघाती निधन झाले होते.
त्र्यंबक थोरवे हे हिरडव येथील नितीन डोळस यांच्याकडे भारतीय स्टेट बँक ग्राहक सेवा केंद्रावर नियमित व्यवहार करत असत. त्यावेळी ग्राहक सेवा केंद्राचे संचालक नितीन डोळस यांनी थोरवे यांना प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजनेची माहीती सांगून सदर योजनेंतर्गत विमा संरक्षित करण्यात प्रोत्साहित केले.
थोरवे यांनी प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना समजावून घेऊन आपला विमा काढून घेतला होता. त्यामुळे त्यांचे निधन झाल्यानंतर प्रधान मंत्री जीवन ज्योती विमा योजनेचा भारतीय स्टेट बँक शाखा हिरडव शाखा व्यवस्थापक यांच्या मार्गदर्शनाखाली ग्राहक सेवा केंद्र चालक नितीन डोळस यांनी पाठपुरावा केला.
त्यातून त्र्यंबक थोरवे यांच्या वारसांना दोन लाख रु चा धनादेश त्यांच्या घरी जाऊन वडील संजबाराव महादू थोरवे यांना प्रदान करण्यात आला. यावेळी भारतीय स्टेट बँक शाखा हिरडव व्यवस्थापक सम्राट, सहाय्यक लिपिक स्वप्नील तायडे, ग्राहक सेवा केंद्र चालक नितीन डोळस, संदीप ओव्हर, प्रभाकर जउळकर, श्रीकिसन ओव्हर उपस्थित होते .











