पुणे: महान्यूज लाईव्ह
पुण्यातील कळस भागात ही दुर्घटना घडली असून येथील एका कुटुंबातील घरातील मोरीची भिंत अंगावर पडून चिमुकल्या मुलाचा दुर्दैवी अंत झाला. मोहम्मद आरिफ खान असे या दहा वर्षीय मुलाचे नाव असून, विश्रांतवाडी पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
कळस येथे खान कुटुंब राहते. मोहम्मद चे वडील रिक्षाचालक असून, चुलता चुलतीसह एकत्र कुटुंब भाड्याच्या घरात राहतात. खान यांच्या घरातील असलेल्या मोरीची भिंत पावसामुळे ढिसाळ झाली होती.
या भिंतीला मोहम्मद लटकला असता, ती भिंत मोहम्मद च्या अंगावर कोसळली. यामध्ये एक फरशी होती. ती फरशी मोहंमदच्या डोक्याला लागल्याने, गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला. दरम्यान त्याला वेळीच उपचार मिळाले नाहीत असाही आरोप मोहंमदच्या नातेवाइकांनी केला असून, वेळेत उपचार मिळाले असते तर कदाचित त्याचा जीव वाचला असता असे मंहमदचे नातेवाईक सांगत होते.











