• Contact us
  • About us
Tuesday, June 9, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

गुंजवणी प्रकल्प म्हणजे शेतकऱ्यांसाठी भुलभुलैयाच? भोर, वेल्ह्यातील शेतकऱ्यांचा आरोप..!

Maha News Live by Maha News Live
August 26, 2021
in आरोग्य, कामगार जगत, राजकीय, राज्य, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, Featured
0

गुंजवणी प्रकल्पाच्या भूलभुलैयामुळे शेतकरी हैराण

माणिक पवार : महान्यूज लाईव्ह

भोर, दि. २६ – गुंजवणी प्रकल्पाच्या नकाशामध्ये भोर व वेल्ह्यातील गावातील ३० ते ४० टक्के शेतीचे क्षेत्रच दिसत नसल्याने या भागातील शेतीच कोरडीच राहणार आहे. तसेच प्रकल्पाच्या पाणी वाटपामध्ये अनेक त्रुटी असून शेतकऱ्यांना ठेकेदार कंपनीने दिलेले नुकसानभरपाईचे धनादेश सुद्धा वटले नसल्याची धक्कादायक बाब माहितीच्या अधिकारातून शेतकऱ्यांनी मिळवली आहे. गुंजवणी प्रकल्प म्हणजे भूलभुलैया असल्याचे आरोप लहू शेलार यांनी केले आहे.

भोर तालुक्यातील शेतकरी लहू हरीभाऊ शेलार, सोमनाथ मधुकर उकिरडे व प्रशांत वाल्हेकर या शेतकऱ्यांनी माहितीच्या अधिकारातून माहिती मागविली होती. यामध्ये वेल्हा आणि भोर तालुक्यातील ५० ते ६० गावातील अनेक शेतीचा भाग गुंजवणी प्रकल्पाच्या नकाशामध्ये दिसत नाही.

ठराविक गट नकाशात निर्देशीत करण्यात आले आहेत. मुळ अहवालानुसार ज्या ठिकाणावरुन कँनाल जात होता, ते क्षेत्र सोडुन नविन अहवालात नदीच्या जवळुन बंद पाईपव्दारे पाणी जाणार आहे व तेथुन उपनलिकाव्दारे शेतीसाठी पाणी वाटप होणार आहे. जमिनीवर भूसंपादनाचे पडलेले शिक्के निघाल्याशिवाय पाईपलाईनचे काम सुरु करू नये अशी मागणी होत आहे.

कुरंगवडी, पारवडी, सोनवडी, आंबवणे, करंजावणे, चिंचले बुद्रुक, चिंचले खुर्द, अडवली, मार्गासनी, मालवली, विंझर, लाशिरगाव, कोंढवली, वडगाव, सोंडे कार्ले, सोंडे सरपाले, सोंडे हिरोजी, सुरवड, सोंडे माथना, सोंडे, तांबड, हातवे खुर्द, हातवे बुद्रुक, भिलारेवाडी, मोहरी, मोहरी बुद्रुक, आळंदेवाडी, कासुर्डी व इतर डोंगराच्याकडेच्या व इतर गावातील शेतकऱ्यांची अनेक शेती या पाईपलाईनद्वारे भिजणार नसल्याची माहिती अधिकारात असल्याचे शेलार यांनी नमूद केली आहे.

हायड्रोप्रेशर तंत्रज्ञाने डोंगराच्या पायथ्यापर्यंत पाणी पोहचणार असल्याचा दावा केला जातो, तर मग गावच्या नकाशातील इतर गट का वगळण्यात आले? असा सवाल होत यामुळे भोर आणि वेल्ह्यातील शेतकरी गावनिहाय नकाशा प्रसिद्ध करण्याची मागणी होत आहे.

नुकसान भरपाईचे दर ठरलेले नसतानादेखील रुवी टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने शेतकऱ्यांना दिलेले तुटपुंज्या रकमेचे अनेक धनादेश वटले. तालुक्यातील गावात रजिस्टर पाणी वापर संस्था स्थापन केली नसून शेतकऱ्यांना विश्वासात न घेता प्रकल्पाचे काम चालू आहे.

वंचित राहणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतीसाठी धरणातून डिसेंबर ते मे या कालावधीमध्ये आवर्तने सोडण्याचे लेखी राजपत्रित आदेश द्यावे, अन्यथा गुंजवणी प्रकल्पाच्या विरोधात शेतकरी आंदोलने करतील, तसेच या प्रकल्पाच्या विरोधात जनहित याचिका दाखल करण्यात येईल’ असा इशारा शेतकरी लहू शेलार व सोमनाथ उकिरडे यांनी दिला आहे. तर शेतकऱ्यांना दिलेल्या धनादेशाबाबत माहिती नसल्याचे नसरापूर शाखा अभियंता नयन गिरमे यांनी सांगितले.

दिगंबर डुबल, कार्यकारी अभियंता – संबधित शेतकऱ्यांना वेळोवेळी सविस्तर माहिती दिली असून काहीजण चुकीचे संदेश देत आहेत. मूळ प्रकल्पामध्ये समाविष्ट असणारी गावे आणि त्या भागातील समावेश असणाऱ्या क्षेत्राला पाणी देणार आहोत.

Next Post

महाराष्ट्र केसरी अप्पालाल शेख यांचे दिर्घकालीन आजाराने सोलापूर येथे निधन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

May 29, 2026
मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

May 29, 2026
पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

May 29, 2026
गुप्तधनाचा बहाणा… प्राध्यापकाचा बळी; ४० दिवसांनी उघडली खुनी खेळी!

अवैध मुरूम उत्खननाची तक्रार केल्याने तक्रारदारावर जीवघेणा हल्ला! दौंड तालुक्यातील हिंगणीगाडा येथील घटना! तिघांवर गुन्हा!

May 29, 2026
राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

May 29, 2026
बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

May 29, 2026
शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

May 29, 2026
बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

May 29, 2026
‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

May 29, 2026
बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा मोठा भांडाफोड; तुकाराम मुंढेंची राज्यभर पडताळणी मोहीम! 10 हजार 922 कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू; 316 जणांवर कारवाई!

माफी मागून सक्तीची निवृत्ती घ्या!बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांवर न्यायालयाचा मोठा दणका; राज्यभर १२० दिवसांत पुनर्पडताळणीचे आदेश

May 29, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group