बारामती : महान्यूज लाईव्ह
या आहेत, उमाबाई बाबू महानवर.. वय वर्षे 100! म्हणजे त्यांनी आजच वयाचं शतक पूर्ण केलं, बरं का! त्यामुळे आज त्यांच्या मुलं, नातू, परतवंडांनी एकदम भन्नाट माहोल तयार करत आजीचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा केला आणि हॅपी बर्थडे उमाआजी असं म्हणत सर्वांनी घर अगदी डोक्यावर घेतलं..!
बारामती तालुक्यातील बाबुळगाव येथील उमाजी या आहेत अशा वयाच्या शंभरी पार करूनही अजूनही घरचा कारभार आजीच बघतात. वय वर्षे 100 असतानाही आजी शरीराने धनधाकट आहेत. त्यांना नातवंडे, परतवंडे एवढेच नव्हे, तर परतवंडांनाही मुले झाली आहेत.
तरुणपणात केलेल्या काबाडकष्टाने आजही शरीर ठणठणीत असल्याचे कुटुंबिय सांगतात. उमा आजी मेंढ्या राखायला जायच्या. आताही घरावर त्यांचीच कमांड आहे. आज त्यांनी आयुष्याचे शतक पूर्ण केले, म्हणून नातवंडांनी वाढदिवसाच्या निमित्ताने केक कापण्याचा कार्यक्रम आयोजित केला.
गुलाब बाबू महानवर, सतीश बाबू महानवर या मुलांसह नातू छबन गुलाब महानवर, बंडा गुलाब महानवर, तात्याबा गुलाब महानवर, अनिल सतिश महानवर, संतोष सतीश महानवर, ज्ञानेश्वर सतिश महानवर आदींनी हा उपक्रम राबविला.











