औदुंबर क्षीरसागर : महान्यूज लाईव्ह
करमाळा : करमाळा तालुक्यात सुरू असलेली वीज वितरण कंपनीची सक्तीची वीजबिल वसुली थांबवावी, तसेच बंद असलेला वीज पुरवठा त्वरित सुरू करावा या मागणीसाठी संभाजी ब्रिगेड व स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्या वतीने आज बुधवारी (दि.२४) जेऊर वीज वितरण कंपनी कार्यालयावर हलगी नाद आंदोलन करण्यात आले.
यावेळी विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. दरम्यान, या आंदोलनाच्या दणक्याने माघार घेत थांबवलेली वीज तात्काळ सुरु करण्यात आली.
संभाजी ब्रिगेडचे सोलापूर जिल्हाध्यक्ष सचिन जगताप, टेंभुर्णी शहराध्यक्ष सचिन खुळे, मराठा सेवा संघ करमाळा तालुकाध्यक्ष अतुल वारे पाटील, संभाजी ब्रिगेड जिल्हा उपाध्यक्ष शंकर पोळ, करमाळा तालुकाध्यक्ष अमित घोगरे, तालुका कार्याध्यक्ष राजेश ननवरे, तालुका सचिव गणेश डोके, तालुका संघटक दत्ता नलवडे, स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष रवींद्र गोडगे, तालुकाध्यक्ष सुदर्शन शेळके, युवा तालुकाध्यक्ष अमोल घुमरे, तालुका पक्षाध्यक्ष बापुराव फरतडे, सुहास पोळ, सूर्यभान चोरगे, नानासाहेब नाईकनवरे, रोहित तोरणे, नानासाहेब पोळ, भाग्यवंत पोळ, ज्ञानेश्वर पोळ, विशाल पोळ, सोनू रोंगे, किसन पोळ, नवनाथ पोळ ,साहेबराव पोळ, ज्ञानेश्वर लगड, बाळासाहेब तोरमल, आजिनाथ कळसाईत, महेश गोडसे, योगेश पोळ, आबासाहेब लबडे, नारायण देवकर, विष्णू शिरस्कर, अमर गुंड, माऊली गायकवाड, शिवाजी कदम, रेवन सातपुते, रामचंद्र कांबळे, सचिन कांबळे, दादा वळेकर, हनुमंत वळेकर, नागनाथ पोळ, शशिकांत पोळ, प्रदीप पोळ, संदीप पोळ आदी उपस्थित होते.











