• Contact us
  • About us
Tuesday, June 9, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

खुशखबर : गृहनिर्माण संस्थांना पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी आमदार निधीचा वापर करता येणार! राज्य सरकारचा परवानगी देण्याचा विचार!

Maha News Live by Maha News Live
August 24, 2021
in यशोगाथा, आरोग्य, कामगार जगत, राजकीय, राज्य, Featured
0

अनिल गवळी: महान्यूज लाईव्ह

मुंबई: राज्यातील शहरी व गामीण भागातील खासगी जागेवरील गृहनिर्माण संस्थांना पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी आमदार निधीचा वापर करण्यास राज्य सरकार परवानगी देण्याचा विचार करीत आहे.

राज्यात पुढील वर्षांत मुंबईसह अनेक महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुका होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या प्रस्तावाला महत्व प्राप्त झाले आहे. या संदर्भात राज्य सरकारने नियोजन विभागाची एक समिती स्थापन के ली आहे. समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर, या प्रस्तावावर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.विधिमंडळ सदस्यांना मिळणारा स्थानिक विकास निधी कोणत्या कामांसाठी वापरायचा, त्याची मार्गदर्शक तत्वे ठरलेली आहेत.

सध्याच्या मार्गदर्शक तत्वांनुसार सहकारी गृहनिर्माण संस्थांना पायाभूत व अन्य सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी आमदार निधीतून खर्च करण्याची तरतूद नाही. परंतु गृह निर्माण संस्थांना काही सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी या निधीतून खर्च करण्याची परवानगी द्यावी, अशी लोकप्रतिनिधींचीही मागणी आहे.

राज्य सरकारकडेही तशी निवेदने प्राप्त झाली आहेत. त्यानुसार राज्य सरकारने सध्याच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये सुधारणा करण्याचे ठरविले आहे.राज्यातील महानरपालिका, नगरपालिका व नगरपंचायती क्षेत्रातील, तसेच या नागरी क्षेत्रांना लागून असलेल्या ग्रामीण परिसरातील सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या खासगी जागेवर निवडक पायाभूत वा अन्य सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत निधी खर्च करण्यास परवानगी देण्याचा सरकार विचार करीत आहे.

त्यासाठी सध्याच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये कोणकोणत्या सुधारणा वा बदल करणे संयुक्तिक राहील, याचा अभ्यास करण्यासाठी नियोजन निभागाची एक समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यात नियोजन विभागाचे उपसचिव, मुंबई, ठाणे, पुणे महानगरपालिकांचे उपायुक्त, नियोजन उपायुक्त, मुंबई व ठाणे जिल्हा नियोजन अधिकारी, उप जिल्हा निबंधक ठाणे, अंबरनाथ, शहापूर व बारामती नगरपालिकांचे मुख्याधिकारी व नियोजन विभागाचे सहसंचालक यांचा समावेश आहे. दोन महिन्यात समितीला अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे.

राज्यात पुढील वर्षांत म्हणजे सहा महिन्यांतच मुंबईसह दहा महानगरपालिका, नगरपालिका, २५ जिल्हा परिषदा, पंचायत समित्यांच्या निवडणुका होणार आहेत. महाराष्ट्रात मिनी विधानसभा निवडणुका म्हणून त्या ओळल्या जातात. या पार्श्वभूमीवर खासगी जागेवरील सहकारी गृहनिर्माण सस्थांना पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी आमदार निधीचा वापर करण्यास परवानगी देण्याच्या प्रस्तावाला राजकीय महत्वही प्राप्त झाले आहे.

Next Post

वाईमध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात शिवसेनेचा एल्गार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

May 29, 2026
मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

May 29, 2026
पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

May 29, 2026
गुप्तधनाचा बहाणा… प्राध्यापकाचा बळी; ४० दिवसांनी उघडली खुनी खेळी!

अवैध मुरूम उत्खननाची तक्रार केल्याने तक्रारदारावर जीवघेणा हल्ला! दौंड तालुक्यातील हिंगणीगाडा येथील घटना! तिघांवर गुन्हा!

May 29, 2026
राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

May 29, 2026
बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

May 29, 2026
शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

May 29, 2026
बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

May 29, 2026
‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

May 29, 2026
बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा मोठा भांडाफोड; तुकाराम मुंढेंची राज्यभर पडताळणी मोहीम! 10 हजार 922 कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू; 316 जणांवर कारवाई!

माफी मागून सक्तीची निवृत्ती घ्या!बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांवर न्यायालयाचा मोठा दणका; राज्यभर १२० दिवसांत पुनर्पडताळणीचे आदेश

May 29, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group