दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड तालुक्यातील कासुर्डी हद्दीतील आयडीबीआय बॅकेचे एटीएम मशीन फोडून अज्ञात चोरांनी एटीएम मधून तब्बल 11 लाख 58 हजार 300 रुपयांचा ऎवज चोरी केल्याची घटना घडली आहे. ही माहिती यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी दिली.
याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, कासुर्डी येथील आयडीबीआय बॅकेच्या एटीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ते बंद असल्याने बॅकेच्या संबंधित अधिकरांनी दरवाजाचे शटर खाली ओडून 14 ते 23 आगस्ट पर्यंत बंद ठेवले होते.
23 आगस्टला बॅकेचे संबंधित अधिकारी आणि कर्मचारी एटीएम दुरूस्ती साठी गेले असता त्यांना एटीएम तोडून त्यामधील पैसांची चोरी झाल्याचे लक्षात आले. याघटनेची माहिती तत्काळ बॅकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविण्यात आले. या एटीएममधून मधून तब्बल 11 लाख 58 हजार 300 तीनशे रुपयांचा ऎवज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली.
याप्रकरणी बॅकेचे शाखा व्यवस्थापक आशिषकुमार पंचानंद शर्मा (वय 40 ) यांनी यवत पोलीस स्टेशनला फिर्याद दिली असून अज्ञात चोरांच्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस, पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी या एटीएम मशीन आणि परिसराची पाहणी केली. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक केशव वाबळे हे करीत आहेत.











