राजेंद्र झेंडे : महान्यूज लाईव्ह
पुरंदर तालुक्यातील सटलवाडी येथे दौंड तालुक्यातील कासुर्डी येथील अनुसया ज्ञानोबा गायकवाड (वय 104 वर्षे) व गजानन गणपत कदम (वय 102 वर्षे)या भाऊ व बहिणीने आपली आज शंभरावी राखी पौर्णिमा साजरी केली.
याचा व्हिडिओ येथे पहा अथवा महान्यूज लाईव्ह यू ट्यूब वर पाहू शकता.
अनुसया आजी या दौंड तालुक्यातील कासुर्डी गावच्या पण आज या वयात देखील राखी बांधण्यासाठी न चुकता येत असतात. अनुसया आणि गणपत आजोबांनी आपल्या राखीपौर्णिमेची शंभरी पार केली.. अनुसया आजी आणि गणपत आजोबा हे आजही एकमेकांना राखी बांधतात.
अनुसया आजींना मुली 9, मुले 2, नातू 37, परतवंडे 45, खापर परतवंडे 12, तर गणपत आजोबांना 2 मुले, 6 मुली, नातू 22, परतवंडे 28 असा त्यांना गोतावळा बराच मोठा आहे.
सौरभ कदम, आजोबांचा नातू – प्रत्येक राखी पौर्णिमेला आजी या आपल्या भावाला राखी बांधण्यासाठी येत असतात. त्यांच्यातील प्रेम देखील आजही तेवढेच ताजे आहे. वायच्या पंच्याहत्तरीत असलेले गुलाबराव गायकवाड हे आज देखील मामाच्या गावाला येत असतात..