विशाल कदम : महान्यूज लाईव्ह
पती-पत्नी ही संसाराच्या रथाची दोन चाके असतात आणि त्यांच्या रेशीम गाठी या स्वर्गात बांधल्या जातात ते जे कोणी म्हणाले होते तो मूर्ख आहे असे सांगणारी विवाह संस्कृती सध्या समाजात दररोज पाहायला मिळत आहे दररोज एकत्र राहणाऱ्या जोडप्यांमध्ये देखील पैशासाठी कोणत्याही थराला जाण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे घर दोघांचे ही संकल्पना फोल ठरू लागली आहे.
पिंपळे सौदागर येथील सुब्रमण्यम पद्मनाभन अय्यर याच्याविरोधात पिंपरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा दाखल करण्याचे कारण थोडेसे वेगळे आहे. त्याने त्याच्या पत्नीच्या खात्यातील पैसे काढून घेण्यासाठी व पत्नीच्या नावावरील सदनिका स्वतःच्या नावावर करून घेण्यासाठी चक्क मेंदूवर आघात करणाऱ्या गोळ्या पत्नीला दिल्याचा आरोप पत्नीने केला आहे.
अय्यर याने व आणखी एका महिलेने अय्यर याच्या पत्नीचा मोबाईल वापरून तिच्या खात्यातून 50 लाख रुपये स्वतःच्या खात्यात जमा करून घेतल्याची फिर्याद दिल्याने सांगवी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पत्नीच्या नावावर असलेला फ्लॅट विकावा असा तगादा आरोपीने लावला होता. मात्र तिने हा फ्लॅट विकण्यास नकार दिला होता. त्यामुळे आरोपीने पत्नीला फोन करून शिवीगाळ करत बघून घेण्याची धमकी दिली होती. तसेच तिच्याकडील दागिने देखील तो मागत होता, ते दिले नाहीतर तूला कुठेही नोकरी करू देणार नाही, अशी धमकी दिली होती.