पुणे : महान्यूज लाईव्ह
प्रेम विवाह केला, त्या घटनेला चार महिनेही पूर्ण होत नाहीत तोवरच आपल्या प्रेयसी पत्नीचा गळा दाबून खून केल्याचा केल्याची घटना पुण्यात घडली वडगाव खुर्द धायरी परिसरात ही घटना घडली असून राहत्या घरात नवविवाहितेचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
दिशा निकाळजे (वय 19, वडगाव खुर्द, धायरी फाटा) असे मृत्यू झालेल्या तरुण विवाहितीचे नाव आहे. पती अजय निकाळजे हा फरार झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिशा व अजय दोघेही जनता वसाहत परिसरात राहत होते. 4 महिन्यांपूर्वी त्यांचा विवाह झाला होता. त्यांनी प्रेम विवाह केला होता. ते धायरी येथे भाड्याच्या खोलीत राहत होते.
काल सायंकाळी दिशा मृतावस्थेत आढळून आली. ही माहिती मिळताच सिंहगड रोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दिशा हिच्या गळ्यावरील व्रण आणि पती अजय निकाळजे हा निघून गेल्याने तिचा खून झालेला असण्याची दाट शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. अधिक तपास सिंहगड रोड पोलीस करत आहेत.
दरम्यान अजयची बहीण घरी आली. त्यावेळी तिने घरात दिशा बेशुद्ध पडलेली दिसून आली. तिने आईला प्रकार सांगितला. त्यांनी रुग्णालयात नेले. त्यानंतर रुग्णालयाकडून पोलिसांना सांगितला. मग हा प्रकार समोर आला आहे.