पुणे : महान्यूज लाईव्ह
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष एडवोकेट नितीन लांडगे, ज्ञानेश्वर किसन पिंगळे, लिपिक अरविंद कांबळे, राजेंद्र शिंदे आणि आणखी एकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोन लाख रुपयांची लाच घेताना पकडले.
पुणे आणि मुंबई महापालिकांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाला हा मोठा धक्का असून. साधनसुचितेच्या गप्पा मारताना आता भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची कुचंबणा होईल.
लांडगे याने नऊ लाख रुपयांची लाच मागितली होती त्यातील पहिला हप्ता स्वीकारताना दोन लाख रुपये घेताना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने ही कारवाई केली.
महापालिकेत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज दिवसभर महापालिकेचा ताबा घेतला होता. टेंडरच्या मंजुरीनंतर वर्कऑर्डर काढण्यासाठी ही लाच घेण्यात आली होती. आज महापालिकेत सर्वसाधारण सभा सुरू असतानाच एसीबीने धाड टाकली आणि स्थायी समितीचे अध्यक्ष लांडगे याच्यासह पाच जणांना ताब्यात घेऊन चौकशीला सुरुवात केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक राजेंद्र बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.