सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
राजकारणात किती मोठी गंमत असते पाहा! आपण ज्या पक्षात काम करतो, तो पक्ष सोडताना त्या पक्षाला शिव्यांची लाखोली वाहिली जाते आणि नेत्याला देखील!
चार दिवसांपूर्वी इंदापूर तालुक्यातील उद्धट गावातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला; त्यावेळी आम्हाला राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी फसवले असा आरोप या कार्यकर्त्यांनी केला होता. अवघ्या दोनच दिवसात राष्ट्रवादीने याची परतफेड केली.. आणि आज उध्दट मधल्या भाजप कार्यकर्त्यांनी गेली वीस वर्ष हर्षवर्धन पाटलांनी फसवणूक केली म्हणत राष्ट्रवादीत प्रवेश केला..!
इंदापूर तालुक्यातले राजकारण काट्याच्या अणीवर आहे हा गेल्या वीस वर्षातील सर्वांना अनुभव आहे. मात्र एकीकडे राष्ट्रवादीला आपले मत देखे 3000 पदावरून 30000 मतांवर न्यायचे आहे तर भाजपला आपले मतदान 95000 वरून सव्वा लाखावर न्यायचे आहे..
अर्थात या साऱ्या प्रवासात कार्यकर्त्यांची मात्र चांदी होऊ लागली आहे, कारण शेजारच्या बारामती तालुक्यात कार्यकर्त्यांची फारशी विचारपूस होत नाही किंवा कार्यकर्त्यांना दुसरा ऑप्शन देखील नाही; मात्र इंदापुरात तुम्ही कधीही कुठलाही पक्ष बदलू शकता!
विशेष म्हणजे बऱ्याचदा इंदापूर तालुक्यातील पत्रकारांना, नेत्यांना आणि गावकऱ्यांना देखील कोण कोणत्या पक्षात सध्या आहे, याची निश्चित माहिती नसते. त्यामुळे एखाद्याने आपली भूमिका जाहीर केल्यानंतरच हा कार्यकर्ता अमुक पक्षातला आहे, त्यावर विश्वास बसतो..!
आज देखील उद्धट गावातील भाजपच्या अनेक कार्यकर्ते व नेत्यांनी भरणेवाडी ते राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत घड्याळ बांधले. या कार्यकर्त्यांची वीस वर्ष फसवणूक होत होती. या त्रासाला कंटाळून उद्धट गावातील भाजपच्या कट्टर कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीमध्ये जाहीर प्रवेश केला.
सर्वसामान्य जनतेच्या हाकेला धावून येणारे इंदापूर तालुक्याचे लोकनेते हे केवळ ‘राज्यमंत्री’ दत्तात्र्य मामा भरणे आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणार असल्याचे त्यांनी जाहिर केले.
उद्धट गावचे सोसायटीचे माजी संचालक पोपट भोसले, वामन भोसले, उध्दट ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच सुभाष शिंदे व उद्धट गावचे सामाजिक कार्यकर्ते प्रविण रामचंद्र भोसले, नितीन लोंढे यांनी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला.
यावेळी सचिन सपकळ, शुभम निंबाळकर, अरविंद भोसले, प्रमोद थोरात, राजेंद्र थोरात, ललित इंदलकर, नितीन साळवे, लतिफ आत्तार सुमित यादव, अक्षय भोसले, संदिप कुंमार, ज्योतीराम काळभोर, प्रदिप भोरात, सागर भोसले, नितीन साळवे, शुभम कुंभार, विशाल भोसले, सार्थक भोरात विशाल इंगळे, सुरेश चोळ, शाहरूक आतार आदी उपस्थित होते.