लोणार तालुक्यावर शोककळा
संदीप मापारी पाटील, बुलढाणा
लोणार तालुक्यातील हिरडव येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक स्वतंत्र दिनाची तयारी करत असताना अचानक एका शिक्षकाला हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि उपचारापूर्वीच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेने लोणार तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
तालुक्यातील हिरडव येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक भारत दशरथ पाटोळे यांच्या दुर्दैवी मृत्यूने तालुक्यात शिक्षकांचे पालक देखील दुःखात बुडाले अचानक घडलेल्या या घटनेची तालुक्यात जिल्ह्यात चर्चा झाली.
पाटोळे हे सहकारी शिक्षकांसमवेत स्वातंत्र्यदिनाची तयारी करत होते. याच दरम्यान त्यांना अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांना तात्काळ दवाखान्यात हलविण्यात आले मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. भारत पाटोळे हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते साहेबराव पाटोळे यांचे धाकटे बंधू होते