महान्यूज करियर अपडेट
राज्यात आरोग्य सेवा संचालनालयातर्फे सरळसेवेद्वारे गट ड संवर्गातील रिक्त पदे भरली जाणार आहेत. याकरिता आज नऊ ऑगस्टपासून अर्ज उपलब्ध असून 22 ऑगस्ट पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत. आता जाहीर झालेल्या जाहिरातीनुसार 3466 जागांची भरती होणार असून याखेरीज 1152 जागा विविध पदांच्या देखील जागा असणार आहेत.
या भरती अंतर्गत पुण्यामध्ये 346 जागांची भरती होणार आहे की सर्व भरती ऑनलाइन पद्धतीने होणार असून प्रत्येक जिल्हानिहाय यामध्ये जागांची भरती होणार आहे सर्वाधिक जागा या पुणे जिल्ह्यात मांडणार असून त्यापाठोपाठ ठाणे जिल्ह्यात 328 नागपूर जिल्ह्यात 267 तर त्यानंतर 34 जिल्ह्यांमध्ये विविध प्रकारच्या जाहिराती भरले जाणार आहेत या खेरीज पुण्याच्या आरोग्यसेवा उपसंचालक यात 99 जागा भरल्या जाणार आहेत
Https: //arogya.com Maharashtra.gov.in https: //www.arogyabharati2020.in या संकेतस्थळावर अर्ज भरण्याची पद्धत अर्ज डाऊनलोड करण्याची पद्धत तसेच अर्ज आणि समांतर आरक्षणा संदर्भात माहिती घेऊ शकता
या भरती प्रक्रियेत कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक तंत्रज्ञ वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक कुशल कारागीर वीजतंत्री कार्य दशक सेवा अभियंता वरिष्ठ सुरक्षा सहाय्यक अशा विविध पदांच्या जागा आहेत.
याखेरीज 1152 जागांवर गट अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदाची भरती होणार असून, या करता 21 ऑगस्ट ही अंतिम मुदत आहे. यामध्ये अतिविशेष उपचार तज्ञ, बाल रोग तज्ञ, भूलतज्ञ, स्त्रीरोग तज्ञ, शल्यचिकित्सक, नाक कान घसा तज्ञ, नेत्ररोगतज्ज्ञ, अस्थिव्यंग उपचार तज्ञ, त्वचारोगतज्ञ, शरीर विकृती तज्ञ, रक्त संक्रमण अधिकारी, किरण तज्ञ, मानसोपचार तज्ञ अशा विविध पदांचा समावेश आहे.











