उद्धट येथे राष्ट्रवादी काँग्रेस ला भगदाड ; विधानसभेला राष्ट्रवादीच्या गोडबोल्या नेत्याकडून फसवणूक झाल्याचे कारण सांगून राष्ट्रवादी अनेक कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश
इंदापूर : महान्यूज लाईव्ह
विधानसभा निवडणुकीवेळी दिशाभूल करत राष्ट्रवादी काँग्रेस ने अनेक खोटी आश्वासने दिली. मात्र दोन वर्षांमध्ये दिलेली आश्वासन पाळली नाहीत. अशा गोडबोल्या नेत्याने आपली फसवणूक केल्याचे स्पष्टपणे जाहीर करत उद्धट येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला.
या सर्व कार्यकर्त्यांचा भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी उद्धट येथे सत्कार केला. उद्धट गावचे युवा कार्यकर्ते हितेश मखरे, रोहित मुसळे, जुबेर सय्यद, किरण राऊत, समीर कांबळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकून भाजपचे नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या उपस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला.
यावेळी या तरुणांनी विधानसभा निवडणुकीमध्ये आताच्या सत्तारूढांकडून आपली कशाप्रकारे दिशाभूल व फसवणूक करण्यात आली, या बद्दलच्या भावना स्पष्ट शब्दात व्यक्त केल्या व इथून पुढे दूरदृष्टी असलेले भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचे जाहीर केले. याप्रसंगी उद्धव गावचे सरपंच रवी यादव, मार्केट कमिटीचे माजी संचालक दिलीप भोसले, संतोष काळे आदी मान्यवर उपस्थित होते.











