शिरूर : महान्यूज लाईव्ह
जमिनीच्या वादातून झालेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू झाल्यानंतर शिरूर पोलिसांनी मोठ्या शिताफीने आरोपींना अटक केली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, रविवार (दि.8)रोजी कवठे येमाई गावच्या हद्दीतील माळीमळा रोडवर जमिनीच्या कारणावरून भाऊ रानु जाधव यांना बाबाजी रानू जाधव, पुष्पा जाधव, शितल जाधव यांनी लाकडी दांडक्याने गंभीर दुखापत केली होती. या दुखापतीत गंभीर मार लागल्याने भाऊ याचा मृत्यू झाला होता.
याबाबत शिरूर पोलिस स्टेशनला मुलगा संतोष जाधव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
शिरूर पोलिस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल केल्यानंतर शिरूर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत आरोपींचा शोध घेत मुख्य आरोपी बाबाजी रानू जाधव यास अटक केली.
हा तपास पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक संदीप कांबळे, सहायक फौजदार नजिम पठाण, पोलिस नाईक प्रवीण सांगळे, पोलिस नाईक कुडेकर, सुरेश नागलोत यांनी केला.











