पिंपळी येथील थोरात कुटुंबातील दोन सख्या बहिणींचे दहावी-बारावीत घवघवीत यश
सुनील बनसोडे : महान्यूज लाईव्ह
बारामती : दहावीच्या सीबीएसई बोर्डातून व बारावीच्या एचएससी बोर्डातून एकाच वेळी एकाच कुटुंबातील दोन मुलींनी उच्च गुणवत्ता मिळवत आपल्या कुटुंबाचे नावलौकिक वाढवला. तालुक्यातील पिंपळी या गावातील थोरात कुटुंबात ही किमया घडली.
या निकालात कु.समिक्षा अविनाश थोरात हिने विद्या प्रतिष्ठान संचलित “न्यू बालविकास, इंग्लिश मिडीयम स्कूल” पिंपळी या विद्यालयातून सीबीएससी अभ्यासक्रमातून ९४.४० टक्के गुण मिळविले. तिचा विद्यालयात द्वितीय क्रमांक आला.
चैतन्य ॲकॅडमी बारामतीच्या विद्यालयात समीक्षा हिची थोरली बहीण दिक्षा हिने इयत्ता बारावी विज्ञान शाखेतून ९५.८० टक्के एवढे गुण मिळवित चांगले यश संपादित केले.
त्यांच्या या यशाने गावाचा नावलौकिक वाढला असून संपूर्ण गावातून कौतुकाची त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. दोन्ही बहिणींनी मिळविलेल्या घवघवीत यशाची चर्चा सर्व पंचक्रोशीत होत आहे.











