हर्षवर्धन इंगळे : महान्यूज लाईव्ह
सोलापूर : बोरामणी परिसरातील दावल मलिक दर्गा परिसरात देव कार्यासाठी गेल्यानंतर पोहण्यासाठी तलावात उतरलेल्या तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान गेल्या पाच वर्षांतील सोलापूर जिल्ह्यातील अशा प्रकारची ही तिसरी घटना आहे.
या घटनेत या घटनेत रिहाना तोफिक पीरजादे- शेख (वय 35), यासीन हारुन शेख (वय 35), सलीम हारूण शेख (वय 41, सर्व रा. कुंभारी नवीन विडी घरकुल तालुका दक्षिण सोलापूर) या तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
हे तिघे जण परिसरातीलच दर्गा परिसरात देव कार्यासाठी गेले होते. प्रार्थना संपल्यानंतर दुपारी माघारी निघताना येथील तलावात होण्यासाठी उतरले. मात्र पाण्याचा अंदाज आला नसल्यामुळे एकापाठोपाठ एक तिघेही बुडाले.
तलावाच्या नजीक असलेल्या लोकांच्या लक्षात ही बाब आली. मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांना तातडीने दवाखान्यात उपचारासाठी नेण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दक्षिण सोलापूर तालुका पोलिस पुढील तपास करत आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील ही तिसरी घटना
यापूर्वी सोलापुरात नातवाला पोहायला शिकवताना उत्तर सोलापूर तालुक्यातील वडाळा येथे पायात पेंट अडकली आणि पोहता येत असूनही आजोबा पाण्यात बुडाले ही घटना 13 सप्टेंबर 2020 रोजी घडली होती. तर सांगोला तालुक्यातील बेलवणी नदीवर कपडे धुण्यास गेलेल्या नणंद भावजयीचा तीन नोव्हेंबर 2016 रोजी बुडून मृत्यू झाला होता.











