मुंबई : महान्यूज लाईव्ह
राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे हे पुन्हा एकदा बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झाले आहेत. काही दिवसांपूर्वीच एकनाथ खडसे यांच्यावर उपचार झाले होते. त्यानंतर मागील आठवड्यापासून खडसेंवर उपचार सुरू आहेत.
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार युरीन इन्फेक्शन या समस्येमुळे एकनाथ खडसे यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मागील महिन्यात रक्तदाबाच्या समस्येमुळे खर्च यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते या दरम्यान ईडीने त्यांच्यावर हजर राहण्यासाठी नोटीस बजावली होती.











