कुंभमेळ्याच्या दरम्यान रक्त तपासणी प्रयोगशाळांनी बनावट चाचण्या दाखवल्या व आर्थिक फायदा लाटला – ईडीचा दावा
महान्यूज लाईव्ह रिपोर्ट
एप्रिल महिन्यात उत्तरांचलात झालेल्या कुंभमेळ्यादरम्यान दुसरी लाट सुरू होती. या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान झालेल्या तपासण्यांमध्ये प्रयोगशाळांनी सरकारची लूट केली. कमी चाचण्या दाखवून प्रत्यक्षात अधिक चाचण्या केल्याची बिले दिल्याचा दावा ईडीने केलेल्या तपासातून केला आहे. # kumbh #mela, #corona #Uttarakhand #ED
कुंभमेळा ऐन कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान घेतला आणि यावरून झालेल्या टिकेनंतर पंतप्रधानांनी कुंभमेळा आवरण्याची सूचना दिली होती. त्यानंतर उत्तराखंड, उत्तर प्रदेश व इतर राज्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढले होते
मात्र केंद्र सरकारने चार राज्यांमध्ये आरटीपीसीआर व रॅपीड अॅंटिजन चाचण्या करण्याचे कंत्राट दिले होते.
ईडीने यातील नोव्हस पॅथोलॉजी, मॅक्स कार्पोरेट, लालचंदानी लॅब्ज, नालवा लॅबोरेटरी, डीएनए लॅबोरेटरी अशा प्रयोगशाळांवर धाडी चाकल्या. या प्रयोगशाळांच्या संचालका्ंच्याही घरी ईडीने त्यानंतर छापेमारी केली.
या छापेमारीदरम्यान बोगस चाचण्या झाल्याचे व त्यातून या प्रयोगशाळांनी खूप मोठा आर्थिक फायदा लाटल्याचे दिसून आले. कुंभमेळ्यादरम्यान चाचण्याचे कंत्राट दिले असले तरी या प्रयोगशाळांनी प्रत्यक्षात खूप कमी चाचण्या केल्या आणि अधिक चाचण्या केल्याच्या खोटी नोंदी केल्या आणि बोगस बिले दाखवली.
काही प्रयोगशाळा तर कागदोपत्रीच असून त्या अस्तित्वातच नसल्याचेही ईडीला दिसून आले, या संदर्भात उत्तराखंड सरकारच्या महसूल विभागानेही गुन्हे दाखल केले आहेत.











