मुंबई : महान्यूज लाईव्ह
मुंबई महापालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात एलपीजी गॅस गळती झाली आहे. अग्निशामक दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात कामं सुरू करण्यात आले आहे.
गळती झालेल्या भागातून रुग्णांना देखील सुरक्षीत स्थळी हलविण्यात आले आहे. दवाखान्यातील ५८ रुग्णांना इतर ठिकाणी तातडीची अमंलबजावणी म्हणून हलविण्यात आले असून त्यापैकी २० रुग्ण हे कोरोनाग्रस्त आहेत. दरम्यान घटनास्थळी पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी त्वरीत पोचून पाहणी केली.
येथील परिस्थितीचा आढावा घेवून योग्यती खबरदारी घेण्याच्या सूचना देखील त्यांनी केल्या आहेत. रुग्णांशिवाय आजुबाजुच्या सोसायटीमधील काही नागरिकांनाही सुरक्षित स्थळी हलविण्यात आलं आहे. घटनेत कुठल्याही प्रकारची जिवीतहानी झाली नसल्याची माहिती पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी माहिती दिली. महापौर किशोरी पेडणेकर यांनीही घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे.
दरम्यान ही घटना सकाळी साडेअकरा वाजता घडली, मात्र ती कशामुळे घडली. गॅसगळती कशामुळे झाली हे मात्र अद्याप स्पष्ट झालेलेे नाही. चिंचपोकळी भागात हे कस्तुरबा रुग्णालय असून ते ऑर्थर रोड कारागृहाच्या जवळ आहे.











