दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
वाई : लॉकडाउनच्या काळात वाई एमआयडीसीतील साईपर्ण कंपनीत झालेल्या चोरी प्रकरणी वाई पोलिसांनी मोठ्या शिताफीने आणखी चार महिलांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून सुमारे ४ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, मार्च २०२० ते १५ जुलै २०२१ रोजीचे सायंकाळी ५.१५ वा. सुमारास एमआयडीसी (ता.वाई) येथील मे. साईपर्ण सिट्स प्रा. लि. नावचे कंपनीमध्ये यातील आरोपी यांनी आपसात संगनमत करुन कंपनीचे वॉल कंम्पाऊन्डवरून व उघडे दरवाजामधून आत प्रवेश केला.
फिर्यादीचे संमतीशिवाय मुद्दाम लबाडीने रुफिंग शीट्स बनविण्याची जर्मन मेक थायसन एक्सक्युझन ट्विनस्क्रु कंपनीची मशीनमध्ये असणारे पार्ट्स, इलेक्ट्रीक मोटारी, स्विच तसेच पीव्हीसी शिट्स बनविण्यासाठी लागणारे कच्चे मटेरीयल असे ६ लाख ८ हजार ५०० रुपयांचे साहित्य चोरुन नेले.
मशीनचे मुख्य पार्ट व वायरींग इलेक्ट्रीक साहित्याची मोडतोड करुन नुकसान केले. याबाबत फिर्यादी डॉ. संजय चंद्रकांत मोरे यांनी दिले फिर्याद वरुन गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या कर्मचा-यांना पोलिस निरिक्षक आनंदराव खोबरे यांनी सुचना देवून कामगीरीवर लावलेले होते.
सदरचे आरोपी यांच्या ठावठिकाण्याबाबत माहीती प्राप्त करीत असताना गोपनीय बातमीदरामार्फत माहीती मिळाली की, सदरच्या चोरी करणार्या महीला वाई एम. आय. डी. सी. परिसरात पुन्हा फिरत आहेत. त्यानूसार सदर ठिकाणी जावून छापा टाकून ४ महीलांना ताब्यात घेतले.
त्यानंतर त्यांना गुन्हयाचे तपासकामी अटक करुन त्यांच्याकडे विचारपूस करता त्यांनी मे. साईपर्ण सिट्स प्रा.लि.नावाच्या कंपनीमध्ये चोरी केली असल्याचे कबूल केले.तपासादरम्यान सदर आरोपींनी या कंपनीमधील चोरून विकलेला व त्यांचे ताब्यात मिळालेला सुमारे ४ लाख २५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल, त्यामध्ये ४०० किलो तांब्याच्या तारा व २५,०० किलो लोखंडी रॉड हस्तगत करण्यात आला.
या प्रकरणी छाया रमेश गोसावी ( वय ४०), सुर्वणा विश्वनाथ गोसावी ( वय २९), मेघा किरण मोरे ( वय ३०), छाया प्रताप गोसावी (वय ४०, सर्व रा. गोसावीवस्ती, सैदापूर, ता. जि. सातारा) यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडुन मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे व गुन्हे प्रकटीकरण पथकातील कर्मचारी विजय शिर्के, सोमनाथ बल्लाळ,
किरण निंबाळकर, श्रावण राठोड, गोळे, सोनाली माने, शितल साळुखे यांनी सहभाग घेतला होता.











