बाबुर्डीच्या विकासासाठी निधी कमी पडून देणार नाही : संभाजी होळकर यांचे बाबुर्डीकारांना आश्वासन.
बारामती : महान्यूज लाईव्ह
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त बाबुर्डीमध्ये वृक्षारोपण करण्यात आले आणि बाबुर्डी शेरेवाडी सुपा रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.
या रस्त्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून सुमारे 80 लाख रुपये मंजूर झाले आहेत. तसेच बाबर्डी गावातील भैरवनाथ मंदिर चौक ते खंडोबा मंदिर या रस्त्याचेही भूमिपूजन करण्यात आले. या रस्त्यासाठी सुमारे 15 लाख रुपये मंजूर झाले आहेत.
या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बारामती तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, जिल्हा परिषद सदस्य भरत खैरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बाळासाहेब पोमणे, सरपंच ज्ञानेश्वर पोमणे, उपसरपंच दिपाली जगताप, ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय ढोपरे, मनिषा बाचकर, मंगल लव्हे, तंटामुक्ती अध्यक्ष किरण जगताप, लक्ष्मण पोमणे, शांताराम ढोपरे, सोनबा लव्हे, साहेबराव पोमणे, अशोक कोकणे, संतोष पोमणे, सुरेश राऊत आदी मान्यवर उपस्थित होते.











