दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
वाई, दि. ४ : वाई तालुक्यातील जोर येथे झालेल्या भुस्खलनातील पिडीतांना आज श्रीनिवास पाटील फाउंडेशन, सुरेंद्र पठारे फाउंडेशन व सर्व सहयोगी संस्था यांच्या वतीने आज तयार भोजन व ड्रायफुड पॅकेट्सचे वाटप सौ. रचनादेवी पाटील व अँड. निलेश डेरे यांच्या हस्ते करण्यात आले.
जोर येथे काही दिवसांपुर्वी झालेल्या भुस्खलनात दोन जणांचा मृत्यू झाला. त्यांचे मृतदेहही अद्याप मिळालेले नाहित. या भागातील सुमारे १३ पुल तुटल्याने या गावाचा संपर्क तुटला. कुठल्याही पध्दतीने तिथे संपर्क होत नव्हता. त्यामुळे येथील ग्रामस्थांचे हाल होत होते.
अनेक सामाजिक संस्था आपापल्या परीने मदत करित होत्या. परंतू पुराने व भुस्खलनाने घरातील शिदाच वाहून गेला होता. यातच श्रीनिवास पाटील फाउंडेशन, सुरेंद्र पठारे फाउंडेशन व सर्व सहयोगी संस्था व व्यक्ती यांच्या संयुक्त सहकार्यातून आजपासून जोर गावातील नुकसानग्रस्तांना गुरूद्वारा श्री गुरुसिंग सभा पुणे यांच्या सहकार्याने लंगर सेवेच्या माध्यमातून तयार भोजन व ड्राय फुडचे पॅकेट्सचे वाटप प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन आजपासून सुरू करण्यात आले.
पहिल्या दिवशी जवळपास ४०० हून अधिक भोजन पॅकेट्स वाटण्यात आले. श्रीनिवास पाटील फाउंडेशनचे अध्यक्ष सारंग श्रीनिवास पाटील, सुरेंद्र पठारे फाउंडेशनचे सुरेंद्र पठारे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी सौ. रचनाताई पाटील, अॅड. निलेश डेरे व सर्व सहयोगी संस्थाचे प्रतिनिधी उपस्थित होते. पुढील काही दिवस हे मदतकार्य सुरू राहणार आहे.
यामध्ये महाराष्ट्र सोशल मीडिया असोसिएशन, आँस्टिन चाळीे कॅफे, एएसए ग्रुप, विन्सी फिलीप, विमान नगर वुमन क्लब, आॅरनेट ज्वेल्स, विशाल फुड प्लाझा, हॉटेल सातारी गावरान ठसका यासोबतच अनेक दाते सढळ हाताने मदत करत आहेत.











