पुणे : महान्यूज लाईव्ह
सुसंस्कृत पुणे शैक्षणिक पुणे विद्येचे माहेरघर पुणे पुणे तिथे काय उणे असंही म्हटलं जातं आणि ते काहीच खरं खोटं असल्याचा प्रत्यय काल रात्री टिळक रस्त्यावरील हिराबाग चौकात एका पुणेकर तरुणीने दाखवून दिला.
याचा व्हिडिओ येथे पहा अथवा महान्यूज लाईव्ह फेसबुक पेजवर पाहू शकता.
काल रात्री अकराच्या सुमारास पुण्यातील टिळक रस्त्यावरील हिराबाग चौकात तरुणीने रस्त्यावर झोपून वाहतूक अडवली. आपल्या अंगावरून गाडी घालण्याची सूचना वाहन चालकांना करत होती.
त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली. अखेर या भागात गर्दी झाल्याने वाहने आजूबाजूने जाण्याचा प्रयत्न करत होती. या संदर्भात पोलिसांनी गुन्हा दाखल केला की नाही हे अद्याप समजू शकलेले नाही. कदाचित हे गर्भश्रीमंत बाळ असावं, ज्याला फार टेन्शन आल्यामुळे त्या बाळाने दारू पिऊन झोपण्यासाठी कुठेही जागा नसल्याने रस्ता काढला असावा अशी उपरोधिक प्रतिक्रिया त्या चौकातील लोकांनी व्यक्त केली.











