खंडाळा : महान्यूज लाईव्ह
वाई-खंडाळा-महाबळेश्वरचे आमदार मकरंद पाटील याचे निकटचे कार्यकर्ते व शिरवळ राष्ट्रवादी विदयार्थी काँग्रेसचे पदाधिकारी सुशांत जाधव यांची महाराष्ट्र प्रदेश रोजगार उपक्रमाच्या सातारा जिल्हा समन्वयकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
ही माहिती राष्ट्रवादी विदयार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल गव्हाणे व प्रदेश सरचिटणीस सौरभ देशमुख यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मान्यतेने महाराष्ट्र राष्ट्रवादी विदयार्थी काँग्रेस रोजगार उपक्रमातंर्गत महाराष्ट्रातील 34 जिल्ह्यातील जिल्हा समन्वयक पदाच्या निवडी करण्यात आल्या आहेत.
यामध्ये सुशांत जाधव यांची नियुक्ती करण्यात आली. या निवडीबद्दल खासदार श्रीनिवास पाटील, आमदार मकरंद पाटील, सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले, राष्ट्रवादी विदयार्थी काँग्रेस सातारा जिल्हाध्यक्ष डॉ वैभव कळसे, खंडाळा पंचायत समिती सभापती राजेंद्र तांबे, राष्ट्रवादी विदयार्थी काँग्रेस खंडाळा तालुकाध्यक्ष प्रविण खंडागळे यांनी अभिनंदन केले.