• Contact us
  • About us
Monday, June 8, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

धक्कादायक : पाटस येथे निलंगा ते भिवंडी एसटी बसमधील प्रवाशांना पोलीस असल्याचे सांगून मारहाण करून 1 कोटी 12 लाख रूपयांना लुटले…

Maha News Live by Maha News Live
August 3, 2021
in आरोग्य, कामगार जगत, क्राईम डायरी, राज्य, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, Featured
0

राजेंद्र झेंडे,महान्यूज लाईव्ह

दौंड : पुणे सोलापूर महामार्गावरून लातुर ते निलंगा (मुंबई ) एसटी बसमधून प्रवास करणारा चार प्रवाशांना तीन जणांनी पोलीस असल्याचे सांगत एसटीमधून मारहाण करीत खाली उतरवून त्यांच्याकडील रोख रक्कम आणि इतर मौल्यवान वस्तु अशा 1 कोटी 12 लाख 36 हजार 860 रुपयांचा ऎवज लुटून अज्ञात चार इसम दुचाकीवर पुणे आणि सोलापूर दिशेने पसार झाले आहेत.

ही घटना मंगळवारी (दि.3) रात्री 1.15 वाजण्याच्या सुमारास पाटस हद्दीतील ढमाले वस्तीजवळ घडली अशी माहिती पोलीसांनी दिली. दरम्यान, या घटनेनंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग आणि यवत पोलीस स्टेशनचे पोलीस पथके आरोपींच्या शोधात तैनात करण्यात आली आहेत.

पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, न्यू इंडिया कुरीअर सर्विस कंपनीत काम करणारे कर्मचारी हितेंद्र बाळासाहेब जाधव (वय 29 रा.वाघोशी ता.फलटण जि.सातारा ) हे लातुर ते मुंबई एक दिवसाआड पार्सल पोहच करण्याचे काम करतात,

त्यांना न्यू इंडिया कुरीअर कंपनीचे मालक दशरथ बोबडे यांनी त्यांच्या कुरिअर कंपनीत प्राप्त होणारी रोख रक्कम व मेटल पार्सल लातूर ते मुंबई जाण्यासाठी एसटी चा एक आठवडा पास काढला असल्याने ते सोमवारी (दि. 2 ) सायंकाळी पाच वाजता न्यू इंडिया कुरियर सर्विस कंपनीतून रोख रक्कम आणि एक पार्सल भुलेश्वर पायधुनी मुंबई येथे घेऊन निघाले.

लातुर ते सोलापूर एसटीने सोलापुरपर्यंत आल्यानंतर निलंगा ते भिवंडी एसटी बसमध्ये बसून पुढील प्रवासाला निघाले, गाडीमध्ये गर्दी असल्याने ते मागच्या सीटवर जाऊन बसले ही एसटी बस रात्री एक वाजता पाटस टोल नाका येथे आल्यानंतर एसटीबस मधील कंडक्टरने पाटस आले आहे, येथे कोणी उतरणार आहे का? असे विचारले.

यावेळी एक व्यक्ती चालू बसमधून खाली उतरली. एसटीबस पाटस टोल नका सोडल्यानंतर
दोन ते अडीच किलोमीटर अंतरावर असलेल्या ढमाले वस्तीजवळ आली. बस थांबली. तीन जण एसटीमध्ये चढले. त्यातील एकाने कंडक्टरला विचारले. एस टी मध्ये पास असलेले कोण आहेत का? कंडक्टरने त्यांना मागे बसले आहेत असे सांगितले.

या तीघांनी तुम्ही दोन नंबर धंदा करता, तुमची तक्रार आली होती, तुम्ही आज सापडला असे म्हणून त्यांच्या हातातील फायबरने मारहाण करून खाली उरवले. तसेच माझ्या सोबत
असलेले तेजस धनाजी बोबडे यांचा मोबाईल काढून घेतला होता. तसेच इतर तिघेजणांना खाली उतरून शिवीगाळ करून मारहाण करीत रक्कम ठेवलेली बॅग काढून घेतली व मोबाईल अशी 1 कोटी 12 लाख 36 हजार 860 रूपयांचा ऎवज मारहाण करून काढून घेतला आणि तुम्हाला पोलीस स्टेशनला गेला तर दाखवतो, तुम्ही दोन नंबरचे काम करता अशी धमकी दिली.

आर्मी कलरची बुलेट व गाडीवर दोघेजण पुणेच्या दिशेने व तिसरा पांढऱ्या रंगाच्या स्कुटी सारख्या गाडीवर बसून सोलापूरच्या बाजूने निघून गेले. मात्र ते पोलीस नसल्याचा या प्रवाशांना संशय आल्याने त्यांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला मात्र ते पसार होण्यास यशस्वी झाले.

याबाबात हितेंद्र जाधव यांनी पाटस पोलीस चौकीत फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक केशव वाबळे, पोलीस उपनिरीक्षक संजय नागरगोजे यांनी घटनेचे गांभिर्य लक्षात घेवून पुढील कारवाई सुरू केली.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी ही पोलीस पथकाच्या टिमसह पाटस येथे धाव घेतली. घटनेची माहिती घेत आरोपींच्या शोधासाठी पोलीसांचे पथकै तैनात केली आहेत. अशी माहिती पोलीसांनी दिली.

Next Post

पाटस येथे बसमधील प्रवाशांना लुटमारीतील एका संशयित आरोपीचे रेखाचित्र पोलीसांनी केले प्रसिध्द!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

May 29, 2026
मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

May 29, 2026
पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

May 29, 2026
गुप्तधनाचा बहाणा… प्राध्यापकाचा बळी; ४० दिवसांनी उघडली खुनी खेळी!

अवैध मुरूम उत्खननाची तक्रार केल्याने तक्रारदारावर जीवघेणा हल्ला! दौंड तालुक्यातील हिंगणीगाडा येथील घटना! तिघांवर गुन्हा!

May 29, 2026
राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

May 29, 2026
बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

May 29, 2026
शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

May 29, 2026
बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

May 29, 2026
‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

May 29, 2026
बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा मोठा भांडाफोड; तुकाराम मुंढेंची राज्यभर पडताळणी मोहीम! 10 हजार 922 कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू; 316 जणांवर कारवाई!

माफी मागून सक्तीची निवृत्ती घ्या!बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांवर न्यायालयाचा मोठा दणका; राज्यभर १२० दिवसांत पुनर्पडताळणीचे आदेश

May 29, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group