संदीप मापारी पाटील, बुलढाणा
लोणार : संयुक्त महाराष्ट्राच्या लढयामध्ये जी अभूतपुर्व चळवळ सुरू केली, त्यामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे मोलाचे योगदान असल्याचे प्रतिपादन लोणार पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद आहेर यांनी चंद्रभागा घरकुल वसाहतीमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 101 व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात केले.
लोणार येथील नविन घरकुल वसाहतीमध्ये चंद्रभागा परिसरात लोकशाहीर अण्णाभाउ साठे यांची 101 व्या जयंतीचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा सौ. पुनम मनिष पाटोळे, प्रमुख उपस्थीतीमध्ये उपनगराध्यक्ष बादशहा खान पठाण, माजी नगराध्यक्ष भूषण मापारी, कॉग्रेसचे नेते साहेबराव पाटोळे, नायब तहसिलदार हेंमत पाटील, लोणार पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद आहेर, पोलीस उपनिरीक्षक भारत बरडे, नगरसेवक कंकाळ, गजानन जाधव, आबेद खान, प्रा. गजानन खरात , शेख रऊफ, रमजान गवळी , संतोष मापारी, डॉ. नेवरे, सतिश राठोड, नितीन शिदे , योगीता साहेबराव पाटोळे ,आंबादास इंगळे, अरूण जावळे, मोहसीन शहा आदी उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांनी व प्रमुख पाहुण्यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पुजन केले. यावेळी शरद आहेर यांनी आण्णाभाऊ साठे यांनी केलेल्या कार्याबाबत बोलताना सांगीतले की जेव्हा संयुक्त महाराष्ट्र चळवळ सुरू होती, त्या वेळेस आण्णाभाऊंनी महाराष्ट्रातील व मुंबईतील जनतेमध्ये लढयाची ज्योत चेतवत हा लढा प्रखर केला.
यावेळी नायब तहसिलदार हेमंत पाटील यांनी आण्णाभाऊ साठे यांचा जीवनपट उपस्थितांसमोर उलगडला, यावेळी सर्वच उपस्थीत भारावून गेले होते. यावेळी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन दिपक कांबळे यांनी केले, तर प्रास्ताविक माणीकराव बाजड यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गजानन बाजड, किसन बाजड, विठ्ठल अवरसमोल, शंकर पाटोळे, राम वाणी, अनिल हिवाळे, जगन साठे, संतोष पाटोळे, आमोल आरे, मनिष पाटोळे, अनिल पाटोळे, निखील पाटोळे, चेतन बाजड, बाबाराव घाटोळे, संजय बाजड आदींनी युवकानी सहकार्य केले. यावेळी लोणार पोलीस स्टेशनचे गोपनिय विभागाचे विठठल चव्हाण, जगदीश सानप, गजानन ठाकरे , महसुल विभागाचे विनोद तोडे आदी कर्मचारी उपस्थीत होते.











