दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
वाई, ता. ३० – साईनाथ मंडळ ट्रस्ट पुणे , युगंधर मित्र मंडळ पुणे आणि वाई तालुका प्राथमिक शिक्षक मदत कमिटीच्या संयुक्त विद्यमाने वाई तालुक्यातील पूरग्रस्त भागातील गोळेवाडी, गोळेगाव या ठिकाणी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
साईनाथ मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष पीयूष शहा यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये राहणाऱ्या लोकांवर आस्मानी संकट कोसळलेले आहे.श्री गणेशाचा प्रसाद म्हणून आम्ही आमच्या परीने काही जीवनावश्यक वस्तू आपणापर्यंत पोहोचवत आहोत. गोळेवाडी, गोळेगाव या गावातील लोकांच्या दुःखामध्ये आम्ही सर्वजण सहभागी आहोत. इथून पुढेही ज्या ठिकाणी मदत लागेल तिथे मदत करण्यासाठी आम्ही सदैव तयार आहोत असे त्यांनी सांगितले.
या मदतीमध्ये प्रत्येकी दोन किलो तांदूळ, दोन किलो गव्हाचे पीठ,एक तेल पिशवी,अर्धा किलो रवा, अर्धा किलो फरसाण, अर्धा किलो तूरडाळ, अर्धा किलो हरभरा डाळ, एक किलो साखर, अर्धा किलो बेसण पीठ ,चहा पावडर, मसाले, मीठ पुडा, बिस्किटे, नाचणी सत्व, असे किट तयार करून 50 कुटुंबांना त्याचे वाटप करण्यात आले. तसेच 40 साडया, लहान मुलांसाठी गोष्टींची पुस्तके, याचेही वाटप करण्यात आले.
वाई तालुका प्राथमिक शिक्षक मदत कमिटीचे वतीने 25 साड्या व 2 किलो तांदूळ पॅकेट ,इ . ची 25 कुटुंबांना मदत करण्यात आली. यावेळी गोळेवाडीचे सरपंच अजय कदम, उपसरपंच जितेंद्र गोळे, माजी सरपंच आनंदराव गोळे, सखाराम गोळे, अंकुश गोळे, सुनील गोळे, महादेव शिर्के, पुणे येथील साईनाथ मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष पीयुष शहा, युगंधर मित्र मंडळाचे अध्यक्ष मयुर पोटे, प्रकाश फाउंडेशनचे अध्यक्ष प्रमोद नरे, नंदूशेठ ओव्हाळ, हर्षद वरे, स्वरुप देवरुखकर, अभिजीत सणस, प्रसाद रावळ, सुनिल सूर्यवंशी, वाई तालुक्यातील प्राथमिक शिक्षक नारायण शिंदे, भास्कर पोतदार, शेखर जाधव, नितीन फरांदे, संतोष शिंदे, शरद पोतदार, सचिन पांढरपोटे, राहुल हावरे तसेच पत्रकार दोलतराव पिसाळ उपस्थित होते.











