दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड तालुक्यातील बोरीबेल येथील विधीज्ञ ॲड. दत्तात्रय पाचपुते यांची दौंड तालुका वकील संघटनेच्या तालुका प्रमुख पदी नुकतीच निवड करण्यात आली. शिवसेना जिल्हाप्रमुख महेश पासलकर यांनी त्यांना नुकतेच निवडीचे पत्र दिले.
निवडीनंतर अॅड,दत्तात्रय पाचपुते म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिवसेना विभागिय नेते खासदार संजय राऊत ,विभागिय समन्वयक रविंद्र मिर्लेकर, बारामती लोकसभा संपर्क प्रमुख सत्यवान उभे आणिजिल्हाप्रमुख महेश पासलकर यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील जनतेला न्याय देण्यासाठी व पक्ष वाढीसाठी प्रामामिक पणे काम करणार आहे. यावेळी दौंड शिवसेनेचे माऊली आहेर,तालुका उपप्रमुख विजयसिह चव्हाण,प्रशांत जगताप आदी पदाघिकारी उपस्थित होते.











