दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड तालुक्यातील नामांकित विधीतंज्ञ अॅड. सुरेश काशीनाथ जाधव यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या लीगल सेलच्या ( लॉयर्स फोरम) शहर अध्यक्ष पदी फेर निवड करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लीगल सेल पुणे जिल्हाध्यक्ष अॅड दिलीप करंडे यांनी सुरेश जाधव यांना शनिवारी (दि.२४) निवड केल्याचे पत्राद्वारे कळविले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विचार सर्व सामान्य नागरिक, स्थानिक पातळीवर पोहोचण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे अॅड सुरेश जाधव यांनी निवडीनंतर सांगितले.
अॅड, सुरेश जाधव यांचे सामाजिक आणि विधी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी याची दखल घेत पक्षाने त्यांना या पदावर फेरनिवड करून पुन्हा एकदा काम करण्याची संधी दिली आहे. त्यांच्या निवडीनंतर जाधव यांचे विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.











