शंभर टक्के फायनान्स, पहिले सहा महिने फक्त पाच हजारांचा हप्ता आणि तीन वर्षानंतर बाय बॅक इन्शुरन्स गॅरंटीदेखील..!
टाटाच्या गाडीसाठी पुणे, बारामतीत हजारो ग्राहकांची विचारणा…
बारामती : महान्यूज लाईव्ह
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लोकल टु व्होकल या संकल्पनेला दाद देत टाटा कंपनीने छप्परफाड स्कीम आणली आहे. टाटा कंपनीची टियागो गाडी शंभर टक्के कर्जाऊ मिळेल. पहिले सहा महिने फक्त ५ हजार रुपये हप्ता, पुढे ५९ महिने ११ हजार रुपये हप्ता आणि एवढेच नाही, तर तीन वर्षानंतर कंपनीकडून पुन्हा खरेदीसाठी बाय बॅक इन्शुरन्स गॅरंटी स्कीमही लागू असणार आहे.
या अशा भन्नाट स्कीममुळे टाटा कंपनीने ऑटो सेक्टरला आलेली मंदी कशी हटू शकते याचा धडाच दिला आहे. विशेष म्हणजे कोरोनाच्या काळात टाटा समूहाने दिलेली भरभक्कम साथ, कोविड हॉस्पिटल उभारण्यासाठी उचलललेी पावले यामुळे अगोदरच देशभक्तीच्या दृष्टीनेही टाटांविषयी सामान्यांचे प्रेम वाढले आहे. याच आकंठ बुडालेल्या प्रेमात पु्न्हा टाटांनी नॅनो नंतर आता लक्झरी कार सामान्यांनी खरेदी करावी यासाठी आणलेली ही योजना सध्या ऑटो क्षेत्रातील ग्राहकांच्या ट्रेंडवर आहे.
पु्ण्याबरोबरच बारामतीतही सध्या याची विचारणा मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे रुद्र मोटर्सच्या सूत्रांनी सांगितले. टाटा टियागो ही गाडी रस्त्यावर ५ लाख ६० हजार रुपये किंमतीची आहे. तिला पूर्णतः टाटा कंपनी अर्थसहाय्य देणार आहे. थोडक्यात खिशातील एकही रुपया अगोदर न टाकता गाडी मिळणार या कल्पनेने कालपासून ग्राहक खुशीत आहेत. या गाडीला बाय बॅक इन्शुरन्स गॅरंटी स्कीम असल्याने ग्राहकांची सध्या पहिली पसंती टियागो गाडीला आहे.
अमोल जगताप, जनरल मॅनेजर, रूद्र मोटर्स – प्रचंड मोठ्या प्रमाणावर या योजनेची विचारणा कार खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांकडून होत आहे. या योजनेची माहिती घेण्याबरोबरच ही कार तातडीने मिळावी अशी इच्छाही ग्राहकांकडून व्यक्त झाली असून काल दिवसभरापासून आज सकाळपर्यंत जवळपास आठशे ग्राहकांनी यामध्ये पसंती दाखवली आहे. दुचाकी गाडीप्रमाणे चारचाकी वाहनासाठी आलेली स्कीम अशा स्वरुपात ग्राहक त्याचे वर्णन करीत आहेत.
(अधिक संपर्कासाठी रोहन -7030937434, समीर – 7030937432)












Khoop changli skim ahe