दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड शहरातील ७० वर्षीय वृद्धाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने त्याच्या संपर्कात आलेल्या एकास कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
आज दौंड उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.संग्राम डांगे यांनी ही माहिती दिली. २६ मे रोजी दौंड शहारात कोरोनाने पहिला बळी घेतला. शहरातील गोवा गल्लीमधील मृत्यू झालेल्या कोविड रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांना क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यापैकी एकास कोरोनाची लागण झाल्याचे वैद्यकीय अहवालात निष्पन्न झाले आहे.
26 मे रोजी शहरातील एका ज्येष्ठ महिलेस कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले होते. मात्र या महिलेच्या संपर्कात आलेल्या सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले असल्याचेही डॉ. डांगे यांनी सांगितले.










