मुंबई : महान्यूज लाईव्ह
सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री, इंदापूरचे लोकप्रतिनिधी व सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या ताफ्यात नेरूळच्या पुलावर खाजगी कार घुसल्याने खाजगी कार घुसल्याने दत्तात्रय भरणे यांच्या कारचा अपघात झाला. सुदैवाने भरणे यांना काहीही दुखापत झाली नाही. मात्र भरणे यांच्या कारसह एस्कॉर्टच्या कारचेही नुकसान झाले. या घटनेप्रकरणी पोलिसांनी खाजगी वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना गुरुवारी (ता.२२) सकाळी घडली.
दत्तात्रय भरणे हे गुरूवारी (ता. २२) मुंबईकडे निघाले असता नेरूळच्या एलपी पुलावर हा अपघात झाला त्यांच्यातर्फे मध्ये अचानक एक खाजगी कार घुसली तिची धडक ताफ्यातील संरक्षणासाठी असलेल्या एस्कॉर्ट च्या कारला लागली त्यामुळे पाठीमागून येणारी दत्तात्रय भरणे यांची कार एस्कॉर्ट च्या गाडीला धडकली.
नेरूळ च्या एलपी पुलावर भरणे यांचा ताफा आला असताना पोलिसांची एस्कॉर्ट गाडी पुढे होती. नेरूळच्या पुलावर दुसऱ्या लेनमधील एक कार अचानक पहिल्या लेन मधील ताफ्यात घुसली. या कार चालकाने मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या कारच्या व पोलिसांच्या कारच्या पुढे जाऊन अचानक ब्रेक दाबल्याने पोलिसांची कार त्या गाडीला धडकली व त्या मागून येणारी भरणे यांना घेऊन जाणारी गाडी पोलिसांच्या गाडीला धडकली. या घटनेनंतर खाजगी वाहन चालक हरीश सरमळकर याच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.











