• Contact us
  • About us
Sunday, June 14, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

गारवा हॉटेलचे मालक रामदास आखाडे यांचा धंदा बघवत नव्हता! व्यावसायिक द्वेषातूनच खून! अल्पवयीन मुलाचा केला वापर! लोणी काळभोर पोलिसांनी १० जणांना ठोकल्या बेड्या!

Maha News Live by Maha News Live
July 26, 2021
in आरोग्य, कामगार जगत, क्राईम डायरी, राज्य, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, Featured
0

विशाल कदम :- महान्यूज लाईव्ह

उरुळी कांचन : पुणे सोलापूर महामार्गावरील उरुळी कांचन (ता.हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील प्रसिध्द असलेल्या गारवा हॉटेलचे मालक रामदास आखाडे यांचा व्यावसायिक स्पर्धेतून खून झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. मात्र, लोणी काळभोर पोलिसांनी २ आरोपींना तब्बल सात दिवसांनी पाठलाग करून लातूर येथील गांधी चौकातून अटक करण्यात आली आहे. याआगोदर पोलिसांनी ८ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

निलेश मधुकर आरते (वय-२३, रा. तुकाईदर्शन, ता. हवेली) व सतरा वर्षीय अल्पवयीन मुलगा असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची माहिती आहे. तर पोलिसांनी यागोदरच निखिल बाळासाहेब खेडेकर (वय २४), सौरभ ऊर्फ चिम्या कैलास चौधरी (वय २१), अक्षय अविनाश दाभाडे (वय २७) करण विजय खडसे (वय २१), प्रथमेश राजेंद्र कोलते (वय २३), गणेश मधुकर साने (वय २०) आणि निखिल मंगेश चौधरी (वय २०, रा. हवेली) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उरुळी कांचन यथील गारवा हॉटेलचे मालक रामदास आखाडे यांच्यावर रविवारी (ता. १८) संध्याकाळी तलवारीने खुनी हल्ला केला होता. या हल्ल्यात आखाडे यांचा बुधवारी पहाटे एका खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. त्यानुसार लोणी काळभोर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

आरोपींना पकडण्यासाठी अपर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण, पोलीस उपआयुक्त नम्रता पाटील आणि सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणराव विधाते, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेन्द्र मोकाशी, पोलीस निरीक्षक (गुन्हे)सुभाष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजु महानोर, दादाराजे पवार, पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे, पोलीस हवालदार नितीन गायकवाड, गणेश सातपुते, राजु पुणेकर, अमित साळुंके, श्रीनाथ जाधव, सुनिल नागलोत, संतोष अंदुरे, संदीप धनवटे, सतीश सायकर, बाजीराव वीर, निखील पवार, गणेश भापकर, शैलेश कुदळे, राजेश दराडे, दिगंबर साळुंके यांचे पथक तयार करण्यात आले होते.

लोणी काळभोर पोलीस तपास करीत असताना आरोपीबाबत कोणताही सबळ पुरावा उपलब्ध नसल्याने तपासात अडचणी निर्माण झाल्या होत्या. परंतु, तपास करीत असताना पथकातील पोलीस हवालदार नितीन गायकवाड, अमित साळुंके, निखील पवार यांना सदर गुन्ह्यात अशोका हॉटेलचे मालक जयवंत बाळासाहेब खेडेकर यांचा भाचा सौरभ उर्फ चिम्या याचा सहभाग असल्याची गुप्त माहीती मिळाली होती. त्यानुसार तपास पथकाने सौर उर्फ चिम्या यांस ताबेत घेवुन कौशल्याने तपास केला असता सौरभ उर्फ चिम्या याने जयवंत बाळसाहेब खेडकर व त्यांचा मुलगा निखील याचे सांगणेवरून अक्षय अविनाश दाभाडे, करण विजय खडसे, प्रथमेश राजेंद्र कोलते, गणेश मधुकर माने, निखील मंगेश चौधरी, निलेश आरते व एक सतरा वर्षीय मुलगा यांचेसह रामदास आखाडे यांचे खुनाचा कट रचुन त्याप्रमाणे निलेश आरते व एका सतरा वर्षीय अल्पवयीन मुलाने रविवारी गारवा हॉटेलचे मालक रामदास आखाडे यांचेवर तलवारीने प्राणघातक हल्ला केला असल्याचे सांगितले.

पोलिसांनी अशोका हॉटेलचे मालक जयवंत बाळसाहेब खेडेकर व त्यांचा मुलगा निखील, अक्षय अविनाश दाभाडे, करण विजय खडसे, प्रथमेश राजेंद्र कोलते, गणेश मधुकर माने, निखील मंगेश चौधरी यांना अटक केली. त्यांच्याकडे चौकशी केली असता हा खून हॉटेलचा व्यवसाय वाढावा म्हणून सौरभ उर्फ चिम्या व इतर यांना दररोज एक ते दोन हजार देण्याचे सांगुन सदरचा खुन घडवुन आणल्याचे निष्पन्न झाले आहे.

दरम्यान, रामदास आखाडे यांचा खून करण्यासाठी आरोपी हे उरुळी कांचन येथील एका भाड्याच्या खोलीत राहून मागील पंधरा दिवसापासून नियोजन करीत होते. तसेच आरोपीने खून करण्यासाठी वापरलेली तलवार हि खास खून करण्यासाठी हडपसर या ठिकाणाहून बनवून घेतली होती. तसेच हा खून सतरा वर्षाच्या अल्पवयीन मुलाने केल्यास शिक्षा होणार नसल्याने हा खून केला असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

आरोपी नामे निलेश आरते हा सराईत गुन्हेगार असुन व त्याच्याबरोबर अल्पवयीन आरोपी हे गुन्हा करून पसार झाले होते, त्यानुसार त्यांचा शोध घेण्याच्या सुचना लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी गुन्हे शाखेच्या पोलिसांना दिले होते. त्यानुसार सदर आरोपींचा पुणे, अहमदनगर, बार्शी, सोलापुर लातूर, उस्मानाबाद जिल्हयात शोध घेत असताना एका खबऱ्यामार्फत पोलिसांना माहिती मिळाली कि, सदर दोन आरोपी हे लातूर येथील गांधी चौक या ठिकाणी आहेत. सदर आरोपी हे पोलिसांचा अंदाज आल्याने सदर आरोपींचा दहा ते बारा किलोमीटर पाठलाग करून सापळा रचून अटक केली. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता वरील गुन्हा केल्याची कबुली दिली. यातील आरोपी निलेश आरते हा हडपसर पोलीस स्टेशन येथुन पुणे शहर व पुणे जिल्हा हददीतुन दोन वर्षाकरीता तडीपार आहे. सदर गुन्हयात एकुण १० आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुभाष काळे पोनि (गुन्हे) हे करीत आहेत.

Next Post

ग्रामपंचायत कर्मचारी संघाच्या इंदापूर तालुकाध्यक्षपदी शिवाजी चव्हाण, सचिवपदी बाबासाहेब मोरे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

May 29, 2026
मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

May 29, 2026
पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

May 29, 2026
गुप्तधनाचा बहाणा… प्राध्यापकाचा बळी; ४० दिवसांनी उघडली खुनी खेळी!

अवैध मुरूम उत्खननाची तक्रार केल्याने तक्रारदारावर जीवघेणा हल्ला! दौंड तालुक्यातील हिंगणीगाडा येथील घटना! तिघांवर गुन्हा!

May 29, 2026
राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

May 29, 2026
बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

May 29, 2026
शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

May 29, 2026
बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

May 29, 2026
‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

May 29, 2026
बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा मोठा भांडाफोड; तुकाराम मुंढेंची राज्यभर पडताळणी मोहीम! 10 हजार 922 कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू; 316 जणांवर कारवाई!

माफी मागून सक्तीची निवृत्ती घ्या!बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांवर न्यायालयाचा मोठा दणका; राज्यभर १२० दिवसांत पुनर्पडताळणीचे आदेश

May 29, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group