युवतींच्या कुटुंबियांनी मानले सुळे यांचे आभार
पुणे : महान्यूज लाईव्ह
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमध्ये महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यातील २० मुली गुजरातमध्ये अडकल्या होत्या. त्यांनी महाराष्ट्रात येण्यासाठी स्थानिक पातळीवरून केलेले सारे प्रयत्न अपयशी ठरल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी संपर्क साधला आणि सुळे यांनी तातडीने गुजरात व महाराष्ट्रातील दोन्ही प्रशासनाशी पाठपुरावा करीत या मुलींना महाराष्ट्रात त्यांच्या घरी पोचते केले. सुळे यांच्या तत्परतेच्या संवेदनशीलतेने या मुलींच्या कुटुंबियांचे चेहरे आनंदाने फुलले व मुलींनी त्यांच्या लाडक्या ताईंचे आभार मानले..!
कौशल्य विकास कार्यक्रमासाठी गुजरात राज्यात वापी आणि सुरत येथे भंडारा जिल्ह्यातील मोहाडी, तुमसर आणि साकोली तालुक्यातील २० मुली गेल्या होत्या. त्यांचा प्रशिक्षण कार्यक्रम संपता संपताच देशात लॉकडाऊन जाहीर झाला आणि त्या सर्वजणी तिथेच अडकून पडल्या. स्थानिक पातळीवर या मुलींनी आणि त्यांच्या पालकांनी महाराष्ट्रातून प्रयत्न केले, मात्र तिकडील प्रशासन दाद देत नसल्याने अखेर काही पालकांनी सुप्रिया सुळे यांच्याशी संपर्क साधून आपली अडचण सांगितली.
राज्यातील मुली गुजरातमध्ये अडकून पडल्या आहेत ही बाब लक्षात येताच सुळे यांनी तातडीने सुत्रे फिरवून या मुलींना परत महाराष्ट्रात आणण्याची मोहिम हाती घेतली. एका बाजूला दोन्ही राज्यांच्या प्रशासनांसोबत पाठपुरावा आणि त्याचवेळी दुसरीकडे या मुलींना मानसिक आधार देणेही आवश्यक होते. त्यासाठी सुळे यांनी राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर यांना या मुलींच्या सतत संपर्कात राहण्याच्या सूचना दिल्या. स्वतः सौ. सुळे या गुजरात सरकार व प्रशासनासोबत योग्य तो समन्वय साधून होत्या. सर्व सोपस्कार अल्प कालावधीत पार पडल्यानंतर या मुलींना परत आणण्याचा मार्ग मोकळा झाला.
या मुलींना आपापल्या घरी पोहोचविण्यासाठी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह गडचिरोलीचे जिल्हाधिकारी दिपक सिंगला तसेच भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी एम. जी. प्रदीप चंद्रन यांनीही मोठी मदत केली. शिक्षणासाठी परक्या मुलूखात जाऊन अडकलेल्या आपल्या लेकी घरी येताच त्यांच्या पालकांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलले.
या मुलींनी खासदार सौ. सुप्रिया सुळे यांचे मानले आभार
https://m.facebook.com/story.php?story_fbid=165619328314208&id=111857893690352










