माणिक पवार : महान्यूज लाईव्ह
भोर – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आदिवासी समाजातील गरजू कुटुंबाना भोर तालुक्यातील राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांचे हस्ते जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले.
पुणे – सातारा महामार्गावरील चेलाडी फाटा ( ता. भोर ) येथील आदिवासी बांधवांना किराणा किटचे वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतरे, माजी उपसभापती विक्रम खुटवड, उपसभापती लहूनाना शेलार, स्वप्नील कोंडे, विद्या यादव, धनेश डिंबळे, निवृत्त्त पोलीस अधिकारी यशवंत कदम, ग्रामपंचायत सदस्य संदीप कदम, केतन शेटे, मोहन इंदलकर, डॉ. सतीश चव्हाण अमित जामदार, दीपक खंडागळे, अमोल लिमन, अमीर बाठे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना रणजित शिवतरे म्हणाले, की कोरोनामुळे अनेकांच्या हाताचे काम गेल्याने कुटुंबे अडचणीत आली आहेत. अशा गरजू कुटुंबांना मदत मिळणे गरजेचे बनले आहे. हे लक्षात घेऊन निराधार, अंध, अपंग गरजू व्यक्तींना कुठल्याही प्रकारची गरज किंवा मदत लागल्यास जिल्हा परिषदेच्या माध्यमातून निधी उपलब्ध करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी आदिवासी जीवनावरील पुस्तक लहान मुलांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांना भेट देण्यात आले.











