पुणे : महान्यूज लाईव्ह
अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर वारंवार अत्याचार केला आणि त्यातून मुलगी गर्भवती राहिली. त्यानंतर हे प्रकरण समोर आलं.
दरम्यान, फेब्रुवारी 2020 ते 2021 या कालावधीत उत्तमनगर परिसरात ही घटना घडली आहे. याप्रकरणी 17 वर्षीय अल्पवयीन मुलीने उत्तमनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रशांत रायकर (वय 25) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीची पीडित मुलीसोबत ओळख झाली. त्यानंतर आरोपीने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिला लग्नाचे आमिष दाखवले. तसेच तिच्यासोबत वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यातून मुलगी गर्भवती राहिली. हा प्रकार तिच्या आई- वडिलांना समजला. त्यानुसार पीडित मुलीने दिलेल्या फिर्य़ादीवरून उत्तमनगर पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल केला आणि आरोपीला ताब्यात घेतले आहे. उत्तमनगर पोलीस अधिक तपास करत आहेत.











