• Contact us
  • About us
Monday, June 8, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी रिंगरोड बाधित शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या

Maha News Live by Maha News Live
July 17, 2021
in सामाजिक, शेती शिवार, आरोग्य, कामगार जगत, राजकीय, राज्य, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, व्यक्ती विशेष, Featured
0
सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी रिंगरोड बाधित शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या

माणिक पवार : महान्यूज लाईव्ह

भोर – शिवगंगा खोऱ्यातील जाणारा रिंगरोड विकासाचा नव्हे तर शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारा असल्याने रिंगरोडला शेतकऱ्यांचा कडाडून विरोध असल्याचे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी राज्याचे नगरविकास व सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर निदर्शनास आणून दिले. रिंगरोड बाबत आणि हवेलीतील २३ गावे पीएमआरडीमध्ये समाविष्ट झालेल्या गावांची समस्याबाबत निवेदन शिंदे यांना देण्यात आले. याबाबत तातडीने मंत्रालयात स्वतंत्र बैठक घेणार असल्याचे शिंदे यांनी ग्वाही दिली.

रिंगरोडला विरोध असणाऱ्या केळवडे ग्रामस्थ आणि रिंगरोड कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी नगरविकास व सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांची केळवडे ( ता. भोर ) काळूबाई मंदिर येथे भेट घेऊन रिंगरोडला विरोध असल्याचे निवेदन देण्यात आले. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रमेश कोंडे, सहंपर्कप्रमुख कुलदीप कोंडे, रिंगरोड हटाव कृती समितीचे शामसुंदर जायगुडे, महेश कोंडे, जितेंद्र कोंडे, शांताराम जायगुडे, बाळासाहेब धुमाळ, राजेंद्र कोंडे, मोहन धुमाळ, भाऊसाहेब जाधव, धनाजी धुमाळ, किरकीटवाडीचे सरपंच गोकुळ करंजावणे, दशरथ खिरीड, गौरव करंजावणे, सचिन पासलकर, मंच्छिंद्र शेलार आदी शेतकरी उपस्थित होते.

कुलदीप कोंडे यांनी शेतकऱ्यांच्या बाजूने भूमिका मांडताना म्हणाले की, विकासाला आमचा विरोध नाही. पण तो विकास होत असताना स्थानिक शेतकरी भुमीहीन व उध्दवस्त होणार आहे. रिंगरोड होत असताना स्थानिक शेतकऱ्यांची सुपीक व बागायत जमीन पूर्ण बाधित होत आहे. त्याच्या उपजीविकेचे साधन नष्ट होणार असल्याचे सांगत कोंडे यांनी सुपीक जमिनीमधून जाणारा रिंगरोड रद्द करून तो डोंगराच्या कडेने पडीक जमिनीमधून करावा. बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा तसेच ९.९० मीटर रुंदी असणारा रोडची रुंदी कमी करून किमान ३६ मीटर करण्यात यावी. रिंगरोडव्या बाजूने बंधिस्त किंवा कंपाउंड नसावे तो खुला असावा, संपूर्ण रोडच्या बाजूने सर्विस रोड असावा अशी मागणी शेतकऱ्यांनी यावेळी केली.

रिंगरोड सुपीक भागातून न जाता रिंगरोडसाठी पर्यायी मार्ग काढून रुंदी कमी करून रिंगरोड खुला करण्याची मागणी बाधित शेतकऱ्यांनी यावेळी केली आहे. तसेच रिंगरोडमध्ये पिकावू बागायती शेतजमीन जात आहे. शेतकरी भुमिहीन होत आहेत, घरे, मंदिरे जात असून नागरीक बेघर होणार असून ओढे, नाले, पाणंद रस्ते अडले जात आहेत. फळबाग लागवड उध्वस्त होत आहे. शेतीच्या पाण्याच्या विहीरी, पाईपलाईन बाधित होणार आहे. उर्वरीत शेतीच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. तसेच पाँली हाऊस, पोल्ट्री फार्म उद्धवस्त होत आहेत अशा शेतकऱ्यांची तक्रारी मंत्री एकनाथ शिंदे यांनी ऐकून घेतल्या. यावर तातडीने मंत्रालयात बैठक घेणार असल्याची ग्वाही शिंदे यांनी शेतकऱ्यांना दिली.

Next Post

काय माणसं मारायचं कंत्राट घेतलं होतं की काय? पाटस दौंड मार्गावर नशिब त्या पुलाच्या कठड्याला, टेम्पोचा अपघात झाला.. ! पाटसमध्ये त्याने चार पाच दुचाक्या उडवण्याचा प्रयत्न केला होता..पुढे काय केले असते कोणास ठाऊक?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

May 29, 2026
मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

May 29, 2026
पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

May 29, 2026
गुप्तधनाचा बहाणा… प्राध्यापकाचा बळी; ४० दिवसांनी उघडली खुनी खेळी!

अवैध मुरूम उत्खननाची तक्रार केल्याने तक्रारदारावर जीवघेणा हल्ला! दौंड तालुक्यातील हिंगणीगाडा येथील घटना! तिघांवर गुन्हा!

May 29, 2026
राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

May 29, 2026
बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

May 29, 2026
शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

May 29, 2026
बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

May 29, 2026
‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

May 29, 2026
बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा मोठा भांडाफोड; तुकाराम मुंढेंची राज्यभर पडताळणी मोहीम! 10 हजार 922 कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू; 316 जणांवर कारवाई!

माफी मागून सक्तीची निवृत्ती घ्या!बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांवर न्यायालयाचा मोठा दणका; राज्यभर १२० दिवसांत पुनर्पडताळणीचे आदेश

May 29, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group